मुरगूड व परिसरातील डोंगर माथ्यावर हजारो बियांची हवाई पेरणी.मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळ 20 वर्षे उपक्रम.
मुरगूड व परिसरातील डोंगर माथ्यावर हजारो बियांची हवाई पेरणी.मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळ 20 वर्षे उपक्रम.
--------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड/ प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------------------
जागतिक तापमान वाढीच्या महाभयंकर वैश्विक संकटावर वृक्षारोपण ही एकच प्रभावी उपाय योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत डॉ .मा ग गुरव यांनी केले . ते जागतिक पर्यावरण दिनी मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळाचे वतिने आयोजित वृक्षाचा वाढदिवस , परिसरातील डोंगरमाथ्यावर बियांची हवाई पेरणी व वृक्षारोपण अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते . या वेळी अध्यक्षस्थानी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ .संदिप घार्गे तर समाजवादी प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष एम टी सामंत व डॉ अशोक गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनश्री मोफत रोपवाटीका व मुरगूड शहर निसर्गमित्रमंडळाच्या माध्यमातून परीसरामध्ये पर्यावरण संवर्धनाची चळवळ विविध उपक्रमांद्वारे पार पाडली जाते.
प्रारंभी गणेश मंदिरासमोरील ' सप्तपर्णी ' वृक्षास मुख्याधिकारी संदीप घार्गे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डॉ . मा.ग. गुरव यांच्या हस्ते केक कापून वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला . त्यानंतर दौलतवाडी डोंगर पठारावर हजारो बियांची हवाई पेरणी करण्यात आली . यामध्ये भोकर, अर्जुन, रिठा, भद्राक्ष, पळस, जांभळ, लिंब, बेहडा, शिसम, बहावा , करवंद,चिंच, सेंद्री, सावर , करंज, आपटा , मोह आदी वृक्ष बियांचा समावेश होता . उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे .
आपल्या प्रास्ताविकात वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी म्हणाले , जागतिक तापमानवाढीच्या फक्त चर्चा होत होत्या पण आता साऱ्यांनाच या जागतिक संकटाचे चटके सोसायला लागत आहेत.ही भविष्यातील सजीवसृष्टीच्या विनाशाची घंटाच वाजत आहे . वृक्षाचे संगोपन होणे ही काळाची गरज आहे .
यावेळी मुरगूड नगरपरिषदेच्या सुरेखा वडर, पंकज दड्डेकर , भैरवनाथ कुंभार , मृत्युंजय सुर्यवंशी , ओंकार सायेकर , रोहन खाडे ,रूपेश काशिद , सुभाष खैरे , सिकंदर जमादार , शुभम खैरे , गजराज माने , नितीन वाडेकर , सिध्देश सुर्यवंशी , विक्रम हळदकर, संदिप वरपे, विजय माने , सिध्देश बुगडे, अमोल कांबळे , तेजस गुरव , मोहन कांबळे , बुध्दीराज माने आदींसह नागरीक उपास्पित होते .
शेवटी आभार ओंकार सायेकर यांनी मानले .
Comments
Post a Comment