50 टक्के अनुदानात ड्रोनच्या साह्याने औषध फवारणी होणार.
50 टक्के अनुदानात ड्रोनच्या साह्याने औषध फवारणी होणार.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
हातकणंगले प्रतिनिधी
--------------------------------------
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी आणि इफको खत कंपनीच्या वतीने एकरी ५० टक्के अनुदानात ड्रोन ने औषध फवारणी केली जाणार आहे. कल्लाप्पाण्णा जवाहर ड्रोन फवारणीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते झाला. यामुळे शेतकऱ्यांना एकरी ३५० रुपयाची बचत होणार आहे. ड्रोन ने फवारणी केल्यामुळे औषधाची मात्रा वाया जाणार नाहीत आणि सरळ पिकाच्या पानावर फवारणी होणार असल्यामुळे मोठा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भात हातकणंगले पंचायत समिती कृषी अधिकारी सतीश देशमुख व जवाहर साखर कारखान्याच्या वतीने बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे. हा शुभारंभ कार्यक्रम कुंभोज तालुका हातकणंगले येथे वाठार रस्त्यावर संभाजी मळा येथे झाला. या कार्यक्रमासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे शेतकरी सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, पंचायत समिती कृषी अधिकारी सतीश देशमुख, कुंभोज सरपंच स्मिता चौगुले, संचालक अभय काश्मीरे, संचालक गौतम इंगळे, संचालक सुकुमार किनिंगे, विजय कुंभोजे, राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर, माजी सरपंच अनिकेत चौगुले, शेती अधिकारी किरण कांबळे, उप शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, भास्कर कोले, प्रवीण चौगुले, जंबो भोकरे, पोपट चौगुले, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, दादा पाटील (संभाजी), अजित गोपुडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment