Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी पोलिसांचा अभिमानास्पद उपक्रम.

 राधानगरी पोलिसांचा अभिमानास्पद उपक्रम.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------

वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्यास सहाय्य.

आजकाल निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.. झाड जंगले तोडून त्या ठिकाणी सिमेंटच्या इमारतीने जागा घेतली असुन शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात उष्णतेची तीव्रता अधिक पहायला मिळते.. या गोष्टींचा सारासार विचार करून कोल्हापूर पोलीस मुख्यालयाकडून जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला करण्यात आले. त्या अनुषंगाने आज राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन केले..यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे पीएसआय महेश गिरडेकर पीएसआय शीतल पालेकर कृष्णात यादव, गजानन गुरव,दिगंबर बसरकर, अनिल गुरव ,अनिल पाटील, भैरव पाटील, महेश रावण,भोसले मेजर आधी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments