राधानगरी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद.
राधानगरी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारे राधानगरीचे दाजीपुर अभयारण्य म्हणजे पर्यटनाची गंगोत्री म्हणायला हरकत नाही.कारण या ठिकाणी वर्षभरातून लाखो लोक पर्यटनासाठी येत असतात. खास गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात अनेक प्राणी पाहायला मिळतात. सध्या जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीसाठी हे अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे.. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जून पासून हे अभयारण्य बंद करण्यात येते.. पावसाळ्यात हे अभयारण्य जरी बंद असलं तरी राधानगरी तालुक्यामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत जी पाहण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी असते.त्यापैकी ऐन पावसाळ्यात सुरू होणारा राऊतवाडी धबधबा अनेक पर्यटकांना खुणावत असतो. या पर्यटन स्थळामुळे स्थानिक लोकांना मात्र रोजगार उपलब्ध झाला आहे. राधानगरी परिसर हा येथील जलाशय, बॅक वॉटर, धबधबे, अभयारण्य अशा विविधतेने नटलेला असुन निसर्गाची ही विविधता पाहण्यासाठी देशभरातून अनेक लोक या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात. मात्र निसर्गाच्या छायेत विसावताना कधी कधी अतिउत्साही पणा देखील घातक ठरतो.. आजवर या पर्यटन स्थळी अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी इथे येताना योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे.
Comments
Post a Comment