वाळु माफियांचा हैदोस..तलवार,खंजीरने केला वार मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
वाळु माफियांचा हैदोस..तलवार,खंजीरने केला वार मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुखेड प्रतिनिधी
----------------------------------
हायवाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल स्वारांनी हायवाची चाबी काढून घेतली त्यामुळे दोन गटात बाचाबाची होवुन तलवार,खंजीर हत्याराने हाणामारी झाल्याने या घटनेत एकजण गंभीर,एक जखमी झाल्याची घटना दि.७ जुन रोजी सकाळी पहाटे ५ च्या सुमारास मुखेड तालुक्यातील चांडोळा गावानजीक घडली याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात फिर्यादी नागेश पोतलवाड रा.मुखेड यांच्या फिर्यादीवरुन सहाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की फिर्यादी नागेश पोतलवाड व त्याचा मित्र शिवानंद चिंतमवाड हे चांडोळा गावाकडे जात असताना चांडोळयाच्या तळयाजवळील कॉर्नरला बिना नंबरच्या हायवाने मोटारसायकल क्रमाक एम एच 26 बी के 1389 या गाडीस मागून धडक दिली. यात फिर्यादीने हायवाची चाबी काढून घेतली असता चालकाची व फिर्यादीची झटापट झाली. एवढयात हुंडाई आय 20 एम एच 05 सी.एम. 8717 ही कार आली.या कारमधून सचिन भरकडे, सुनिल भरकडे,क्रष्णा खानसोळे व ज्ञानेश्वर जाधव यांनी चाबी का काढून घेतलास म्हणुन फिर्यादी व मित्रास मारहाण केली.मारहाण करत असताना फिर्यादी व आरोपी पळून जाऊन आडोशाला लपले असता फिर्यादीच्या मोटारसायकला धडक देऊन चकनाचुर केला त्यानंतर चांडोळा मार्गे निघून गेले. दरम्यान फिर्यादी व मित्र हे पण चांडोळा येथे गेले असता चांडोळा चौकात हुंडाई कंपनीची क्रिटा गाडीतून एम एच 26 सी ई 4129 ही गाडी आडवी करुन सचिन भरकडे, सुनिल भरकडे,कृष्णा खानसोळे व ज्ञानेश्वर जाधव यांनी व यासोबत भगवान भरकडे,हाणमंत भरकडे यांनी तलवार,खंजीर,प्लॅस्टीकच्या दांडयाने फिर्यादीस व त्यांच्या मित्रास मारहण केली.सचिन भरकडे यांनी फिर्यादीच्या पोटात मारहाण करीत असताना याचा वार चुकवला असता डाव्या हाताच्या मनगटाखाली गंभीर दुखापत करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर एक जखमी झाला. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात कलम 307,143,147, 148,149,326,324,323,341,427 भादवि यासह 4/25 भारतीय हत्यार कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार व उप विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मंचक फड हे करीत आहेत.
Comments
Post a Comment