Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अनंतशांतीच्या वतीने कासारवाडा पैकी धनगरवाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

 अनंतशांतीच्या वतीने कासारवाडा पैकी धनगरवाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कौलव प्रतिनिधी 

 संदीप कलिकते 

 -------------------------------------

पत्रकार सुभाष चौगले यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.


    वाढदिवसाच्या खर्चाचा अपव्यय टाळत पत्रकार सुभाष चौगले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राधानगरी धामणवाडीतील कासारवाडा (धनगरवाडा)येथील ५० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना अनंतशांती संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.यामध्ये वह्या,पेन, पट्टी, खोडलबर,शार्पनर यांचा आदी साहित्याचा समावेश होता.दरवर्षी दुर्गम भागाची निवड करत हा शैक्षणिक उपक्रम साकारला जातो.

       जसे मानवाला जीवन जगताना अन्न,वस्त्र निवारा या मुलभुत गरजा आहेत तसेचस्पर्धेच्य युगात टिकून राहण्यासाठी मानवी जीवनात शिक्षण हा महत्त्वाचा घटक बनला आहे. परंतु काही डोगंराळ दुर्गम भागातील लोकांना मुलभूत गरजा भागविणे कठीण आहे. तुटपुंज्या अर्थिक पाठबळावर संसाराचा गाडा हाकावा लागतो त्यामळे कुटूंबाचा संसार व शिक्षण यांचा समतोलच राखता येत नाही. याना दोन्ही पैकी एकालाच प्राधान्य दयावे लागते. देशाच्या भावी पिढीचे नुकसान होते.हा सारासार विचार अनतंशातीचे संस्थापक भगवान गुरव, अध्यक्षा माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील, यांच्या मार्गदर्शना खाली डोगंराळ दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

         या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थित राजर्षि शाहु गव्हर्मेट सर्व्हन्टस को ऑप.बँकेचे उपाध्यक्ष मा. अजित पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप झाले. सामाजिक कार्यकर्ते उमेश पोवार, संभाजी पाटील यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमाला जित पाटील संस्थापक भगवान गुरव, सुभाष चौगले, सामाजिक कार्यकर्ते,संभाजी पाटील उमेश पोवार संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments