आत्मा अंतर्गत खरीप हंगामातील शेतीशाळेस महिलांचा मोठा प्रतिसाद.कोल्हापूर.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी /_ दिनांक ०७/०६/२०२४ रोजी हलसवडे.कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौ.हलसवडे येथील महिलांसाठी खरीप हंगाम मध्ये सोयाबीन पीक व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळा चालू करण्यात आली. याचे उद्घाटन मा.प्रकल्प संचालीका (आत्मा) श्रीमती.रक्षा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतीशाळेस गावातील शेतकरी महिला उपस्थित राहिल्या होत्या प्रकल्प संचालिका श्रीमती रक्षा शिंदे यांनी महिलांना सोयाबीन पीक बाबत शेती शाळेमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले. शेती शाळेचा उद्देश व शेती शाळेमधून महिलांचां होणारा आर्थिक विकास तसेच कृषी विभागाकडून त्याला कसे प्रोत्साहन देऊन उद्योजिका किंवा प्रगतशील शेतकरी कसे बनता येईल याचे मार्गदर्शन केले .त्याच बरोबर सोयाबीन पिकाची पेरणी पासून काढणीपर्यंतचे व्यवस्थापन थोड्याशा शब्दामध्ये त्यांनी महिलाना सांगितले. तसेच आत्मा अंतर्गत सोयाबीन बियाण्याचे वाटप ही त्यांनी केले एकरी एक हजार रुपये अनुदान या तत्त्वावर योजनेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असे जाहीर केले.तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले या मध्ये सांगवडे ,सांगवडेवाडी ,हलसवडे चिंचवाड, वळीवडे ,वसगडे, उचगाव, सरनोबतवाडी,मुडशिंगी अशा गावांचा समावेश आहे. त्याचबरोबर बियाणे उगवन क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया याचेही प्रत्यक्ष महिलांच्या कडून करून घेण्यात आले. याचबरोबर माती परीक्षण करणे काळाची गरज आहे याचीही मोलाचे मार्गदर्शन कृ.स श्री प्रदीप रोकडे सरांनी केले .तसेच करवीर तालुक्याचे बीटीएम श्री.सुंदरम माने यांनी महिला शेतकरी गट स्थापन करण्याबाबत आव्हान केले गटाचे फायदे काय होतात हे सांगण्यात आले व नवीन गटाची निर्मिती केली व गटाला नवीन दिशा देऊन व्यवसाय उभा करण्याचे आवाहन महिलांना केले. तसेच यामध्ये संलग्न विभागाच्या माध्यमातून महिलांना कुक्कुटपालन व पी एम एफ एम इ योजने अंतर्गत व्यवसाय निर्मिती बाबत चे मार्गदर्शन केले हा दौरा मॅडमचा खूप यशस्वीरित्या पूर्ण झाला .या कार्यक्रमांमध्ये आत्म्याचे एटीएम निखिल कुलकर्णी ,बीटीएम सुंदरम माने, कृषी पर्यवेक्षक राहुल पाटील, कृषी सहाय्यक रोकडे सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक गीता कांबळे यांनी केले. तर या वर्षीच्या( 2024-25)सर्व हंगामातील कार्यक्रमांचे आयोजन हे विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर बसवराज बिराजदार सर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे सर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार सर . मंडळ कृषी अधिकारी मोहिनी वाळेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास गावातील प्रगतशील महिला उपस्थित होत्या यात सनंमं कांबळे, सीमा कांबळे ,संगीता कांबळे, मंगल कांबळे, आदी महिला उपस्थित होत्या.
0 Comments