Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब ठरताहेत डोकेदुखी.विज वितरणचे अक्षम्य दुर्लक्ष.

 रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब ठरताहेत डोकेदुखी.विज वितरणचे अक्षम्य दुर्लक्ष.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकूर 

-------------------------------------

 ता.३ : ग्रामीण भागातील अनेक गाव-खेड्यात, वाडी-वस्त्यात विज वितरणचे विद्युत खांब ऐन रस्त्याच्या मधोमध आलेले आहेत. परिणामी संबंधित गावातील अनेक विकासात्मक कामांचा खोळंबा होत असल्यामूळे सदर खांब स्थानिक गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मात्र या गंभीर बाबीकडे विज वितरणचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

    ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करण्यासाठी तेथील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विवीध योजना राबवित आहेत. त्यासाठी गाव,खेडे,वाडी, वस्त्याच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. मात्र काही शुल्लक कारणावरून सदर कामात अडथळा येत असून ग्रामीण विकासाला खीळ बसत असल्याची माहिती हाती आली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील गणेशपुर, पाचंबा गावातील रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब आलेले आहेत त्यामुळे तेथील गावअंतर्गत करण्यात येणाऱ्या अनेक कामात अडथळा निर्माण होत आहे. यामधे प्रामुख्याने रस्त्याच्या काँक्रेटी करणासाठी खुप मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण खोदकाम केल्याशिवाय रस्त्याचे काम मजबूत होत नाही आणि खोदकाम करावे तर विद्युत खांब शेजारच्या घरावर कोसळण्याची भीती त्यामुळे अनेक वेळा निधी उपलब्ध असून सुध्दा रस्त्याचे काम करता आले नसल्याची माहिती येथील लोकनियुक्त सरपंच सौ. शोभा विजय जाधव यांनी दिली आहे. तद्वतच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणुन जलजिवन मिशनचे काम काळजीपूर्वक केले जात आहे. सदर योजनेचे जलकुंभ, विहिरीचे काम पुर्ण झाले असून पाईप लाईनचे काम सुध्दा गावापर्यंत पुर्ण झाले आहे. मात्र गावात पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करावे लागते आणि त्यासाठी विद्युत खांब अडथळा ठरत असल्याची माहिती सरपंच शोभा जाधव यांनी दै. सकाळ सोबत बोलतांना दिली आहे. त्या अनुषंगाने विज वितरण कार्यालय रिसोड यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील वितरणचे कनिष्ठ अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध उभे असलेले खांब हटविण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप देखील सरपंच जाधव यांनी केला आहे. 


*वसुलीत पटाईत कामात मात्र दिरंगाई* 

शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे असो या घरगुती वापराचे असो विजेचे बिल वसूल करण्यात विज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जेव्हढे पटाईत असतात. त्या मानाने कामात मात्र नेहमीच दिरंगाई करतात ही नित्याचीच बाब झाली आहे. परंतु जिवित्वासाठी धोकादायक असलेली विज व विद्युत साहित्य वितरणच्या तांत्रीक विभागाशिवाय कोणीही हाताळू शकत नाही हे माहिती असूनही विज वितरणचे अधिकारी व कर्मचारी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप संबंधित गावकरी करीत आहेत. 


*प्रतिक्रिया* 

" विज वितरण कार्यालय रिसोड येथील कनिष्ठ अभियंता हरिष गीऱ्हे यांच्याकडे खांब हटवण्यासाठी अनेक वेळा ग्राम पंचायत ठराव, निवेदन दिले आहे. परंतु त्यांनी प्रत्येक वेळी आमचा पाठपुरावा कचरा पेटीत फेकून दिला आहे. याची वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे." 

     ____ शोभा जाधव.

   ( लोकनियुक्त सरपंच, गणेशपुर /पाचंबा ता.रिसोड )

Post a Comment

0 Comments