Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगुड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पडला पार.

 मुरगुड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पडला पार.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगुड प्रतिनिधी 

 जोतीराम कुंभार

------------------------------------

   मुरगुड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्यभिषेक शहरांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या दोन वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा राज्याभिषेक सोहळा म्हणून ख्याती मिळवलेला मुरगुड येथील राज्याभिषेक सोहळा यंदाच्या वर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला राज्याभिषेक समितीचे सदस्य सुशांत उर्फ पिलू महाजन यांचे दुःखद निधन झाल्यामुळे यंदाच्या वर्षी हा सोहळा साध्या पद्धतीने करण्याची नियोजन करण्यात आले होते. राज्याभिषेकाची तयारी दोन महिन्यापासून सुरू असतानाच अचानक सुशांत महाजन यांची अकाली एक्झिट झाली यामुळे सर्व सदस्यांनी एकत्र येत यंदाच्या वर्षी सर्व कार्यक्रम रद्द करत प्रतिप्रमाणे गड पूजन मशाल आणि राज्यभिषेक विधिवत पद्धतीने करण्याचे नियोजन केले होते यानुसार आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेल्या बिरदेव मंदिर येथे गडपूजन करून तेथून ज्योत शिवतीर्थ मुरगुड येथे आणण्यात आली मुरगुड नगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती सजावट करण्यात आली होती तसेच शिवतीर्थ परिसरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. गुरुवारी सकाळी आठ वाजता वागणेकर काका यांनी राज्याभिषेक विधीचे पौरोहित केले यावेळी सक्षम सुशांत उर्फ पिल्लू महाजन या बालकासह अतुल भोपळे सोमनाथ यरळकर संकेत शहा यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन बारदेस्कर यांनी केले यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप घारगे यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती जगभर आहे मुरगुड येथील सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार यांनी राज्याभिषेक निमित्त तलाव आणि शिवतीर्थ मुरगुड बस स्थानक आणि कुरणी पुलाशेजारील ओढ्याची स्वच्छता करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले ही कौतुकाची बाब आहे जनतेचा नगरपालिकेच्या सोबत कामांमध्ये चा सहभाग खरच गौरवपूर्ण असल्याचे उद्गार त्यांनी काढले 

यावेळी आभार ओंकार पोतदार यांनी मानले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रार्थना झाल्यानंतर सुशांत उर्फ पिल्लू महाजन यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संध्याकाळी समितीतर्फे भव्य आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मुरगुड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे, मुरगुड नगरपालिका अभियंता प्रकाश पोतदार,अरुण मेंडके, पांडुरंग मगदूम पृथ्वी उर्फ बाळू चव्हाण, रोहित उर्फ सोन्या मोरबाळे, अजित कांबळे, प्रणव रामाने, अभी मिटके, रणजीत मोरबाळे, सर्जेराव भाट, बबन बारदेस्कर, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, सदाशिव अंगज, विक्रांत भोपळे, अजित मेंडके, धीरज गोधडे यांच्यासह मुरगुड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी नगरपालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments