Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खुनाचा प्रयत्न ह्या गुन्हयातील फरारी आरोपी भाग्यश्री शंकर भिंगारदेवे हीस सात वर्षानंतर अटक करण्यात वडूज पोलिसांना यश मिळाले.

 खुनाचा प्रयत्न ह्या गुन्हयातील फरारी आरोपी भाग्यश्री शंकर भिंगारदेवे हीस सात वर्षानंतर अटक करण्यात वडूज पोलिसांना यश मिळाले. 

----------------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

 अमर इंदलकर 

--------------------------------------

  पोलीस स्टेशन वडूज गु.र.नं. 211/2017 भादविस कलम 307,323,504,506,34 अन्वये दिनांक 09/06/2017 रोजी दाखल गुन्हे एकुण 4 आरोपीविरुध्द दाखल झाले होते . नमुद गुन्हयात या पुर्वी 3 आरोपीस अटक झाली होती. परंतु आरोपी नामे रुपाली ऊर्फ भाग्यश्री शंकर भिंगारदिवे वय 36 वर्ष रा. मायणी ही मिळुन येत नव्हती. 

      दि.08/06/2024 रोजी सकाळी पोलीस स्टेशन वडुज येथील महिला पोलीस अंमलदार प्रतिभा केशव कदम यांना गोपनीय महिती मिळाली की, नमुद महिला वेगळया नावाने काडगाव ता.विटा येथे राहत आहे. प्राप्त गोपनीय बातमीची खातरजमा करुन आज सकाळी पो.स्टे.वडुज येथील तपास पथकाने रुपाली उर्फ भाग्यश्री शंकर भिंगारदिवे यांना अटक करुन मा.न्यायालयासमक्ष हजर केले आहे.   

       सदरची कामगिरी मा.समीर शेख सर,पोलीस अधीक्षक,सातारा, मा.आँचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,सातारा श्रीमती अश्विनी शेंडगे, उप विभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज घनश्याम सोनवणे, पोलीस निरीक्षक वडूज यांचे मार्गदर्शणात पोहवा प्रतिभा कदम, पोहवा प्रविण सानप,अमोल चव्हाण,पो.कॉ. अजय काळेल,द-याबा नरळे, कुंडलीक कटरे, मकसुद शिकलगार, सत्यावान खाडे, मपोशि विद्या जाधव, मपोशि मेघा शिंदे, चालक किरण चव्हाण यांनी केली असुन पुढील तपास श्री अमीत शिंदे पोलीस उप निरीक्षक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments