Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन.

 रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन. 

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकूर

--------------------------------------

 रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती ही आर्थिकदृष्ट्या बलाढ्य मानली जात असून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती ही नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव विजय देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून त्याच अधिकाऱ्याकडे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव पदाचा पदभार देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून सचिव पदाच्या पदभारास विरोध दर्शविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून 8 जून 2024 रोज शनिवारला लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे की,


दि.15 जुन 2024 च्या सभेमध्ये विषयसुचीनुसार सचिव पदाचा पदभार देणे बाबतचा विषय मोघम स्वरुपाचा असल्यामुळे आम्ही आस्थापनेवरील सर्व कर्मचारी दिनांक 8 जुन 2024 पासुन लेखणीबंद आंदोलन करणार असून,बाजार समितीचे कार्यरत प्रभारी सचिव आश्रु प्रल्हाद कानडे यांनी बाजार समितीच्या कार्यालयात सचिव पदाचा पदभार सोडण्याकरीता कुठल्याही प्रकारचा लेखी स्वरुपाचा अर्ज केलेला नाही. त्यामुळे बाजार समितीचे सभापती यांनी दि.6जुन 2024 च्या तयार केलेल्या विषय सुचीमध विषय क्र. 03 असा घेण्यात आला की, सचिव पदाचा पदभार देणे बाबत विचार विनीमय करणे असुन सदर विषय हा मोघम स्वरुपाचा असल्याने त्यामध्ये सचिव पदाचा पदभार हा समितीच्या आस्थापनेवरीत कोणत्या कर्मचाऱ्यांकडे द्यावयाचा आहे. याचा कुठल्याही प्रकारचा बोध होत नाही. त्यामुळे आस्थापनेवरील कार्यरत सेवा जेष्ठाता कर्मचारी आश्रु प्रल्हाद कानडे व इतर कर्मचारी यांनी तत्कालीन सचिव विजय देशमुख यांच्या विरोधात वेळोवेळी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप व तक्रारी केल्या असुन सदर तक्रारी ह्या न्यायप्रविष्ठ असल्याने आपण दि.15 जुन् 2024 च्या सभेची विषयसुची तयार केली असुन त्यात मोघम स्वरुपाचा विषय क्र.03 ला विरोध ,आक्षेप असल्यामुळे सदर विषय हा आस्थापनेवरीत सेवाजेष्ठता कर्मचारी यांचे नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा अन्यथा आम्ही आस्थापनेवरील सर्व कर्मचारी दि.08जुन 2024 पासुन लेखणीबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यालयीन कामकाज ठप्प राहणार असून या लेखणीबंद आंदोलनाचा शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नसल्याचे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.जोपर्यंत आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार केला जात नाही तोपर्यंत आम्ही लेखणी पण आंदोलन सुरू ठेवू असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर ए.पी.कानडे,


व्ही.एस. गिहे,पि.व्ही. सपकाळ,


आर.एस. दुबे,ए.एफ. शिंदे,


व्हि.ओ. देशमुख,जि.के. धोंगडे,


जे.टि.पाचरणे,पि.जी. नरवाडे,पि.जी.राजे,जि.एम.पावडे


के.डी. पडघान,एस.बी. घायाळ


एस.एम. धांडे,के.बी.मगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments