Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा पोलीस स्टेशन तर्फे अवैध ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा.

 लोहा पोलीस स्टेशन तर्फे अवैध ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

-----------------------------

7 हजार रुपयांच्या मुद्देमालासह कीबोर्ड माऊस मॉनिटर चार्ट बोर्ड चिठ्ठ्या जप्त. आरोपी अटकेत.

दि.9/6/24 रोजी लोहा पोलीस यांना माहिती मिळाली होती की, लोहा शहरामध्ये अवैद्यपणे ऑनलाइन जुगार खेळला व खेळविला जात आहे यामध्ये कम्प्युटर टीव्ही मॉनिटर कीबोर्ड चार्ट याचा वापर करून पैसे लावून हारजितचा चा खेळ खेळला जात आहे.

 या माहितीवरून  फौजदार निवळे साहेब  पोलीस अंमलदार डफडे, राठोड यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचुन छापा कारवाई केली.

 सदर पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये पोलिसांना सात हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीसह मिळून आला.

 सदर छापा यामध्ये एक मॉनिटर कीबोर्ड माऊस चार्ट जुगाराचे इतर साहित्य व चिट्ट्या मिळून आल्या.

 पोलिसांनी वरील साहित्य व रोख रक्कम जप्त करून सदर आरोपीस अटक करून

 लोहा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या आदेशाने पीएसआय निवळे साहेब पोलीस अमलदार डफडे, राठोड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments