Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ट्रेलर च्या धडकेत युवक गंभीर जखमी.

 ट्रेलर च्या धडकेत युवक गंभीर  जखमी.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज  महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

----------------------------------------

आज बुधवार दि 5 जून 2024 रोजी दुपारी 12 च्या सुमारास   RJ 06 GD  8856 ह्या क्रमांकाचा 22  चाकी ट्रेलर  मयूर फाटा ,शिरोली एम आय डी सी येथे सर्विस रस्त्यावरुन आला असता या ट्रेलर ने MH 09 AT 7869 या दु चाकी ला जोराची धडक दिली.धडक दिल्यानंतर दु चाकी  जवळपास 100 फूट फरफटत गेली होती. या  ट्रेलर ची  पुढील दोन चाके दु चाकीस्वाराच्या कमरेवरून गेल्याने कमरे खालच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता.घटनास्थळावर चे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. ट्रेलर चालक घनश्याम भिल मु.पो.जयसिंहपुरा,ता.हुरडा,जि.भिलवाडा, राजस्थानचा असून तो शिवशक्ती ट्रान्सवेज कलंबोली ,नवी मुंबई यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला असल्याचे समजते. ट्रेलर घेऊन  तो बेंगलोरहून मुंबईकडे निघाला होता. जखमी युवक महंमदआरिफ महंमदइसाक बेपारी,रा.सदरबाजार ,कोल्हापूर येथील आहे.तो कामानिमित्त शिरोली एम आय डी सी येथे आल्याचे समजते.घटना घडल्या नंतर तात्काळ रुग्णवाहिका व पोलीस स्टेशन ला स्थानिक नागरिकांनी कळविले. पण अपघात झाल्यामुळे सेवा रस्त्यावरील तसेच हायवे चे ट्रॅफिक जाम झाल्याने पोलीस व रुग्णवाहिका यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.अपघातस्थळी पंचनामा झाल्यानंतर जखमीस पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. अपघातामुळे वाहनांच्या फार मोठ्या रांगा लागल्या होत्या. जखमीस रुग्णवाहिकेतून नेल्यानंतर जवळपास तासभर पोलीसांना वाहतूक सुरळीत करावी लागली.

Post a Comment

0 Comments