मुरगुड मध्ये संशयास्पद वाटणाऱ्या फासेपारधी लोकांना त्यांच्या मूळ गावाकडे दिले पाठवून.
मुरगुड मध्ये संशयास्पद वाटणाऱ्या फासेपारधी लोकांना त्यांच्या मूळ गावाकडे दिले पाठवून.
-----------------------------------
जोतीराम कुंभार
-----------------------------------
मुरगुड शहरांमध्ये गेले अनेक महिने चोरींचे प्रकार घडत आहेत यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे याच पार्श्वभूमीवर मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी आपल्या दारामध्ये अथवा गल्लीमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन केले होते त्यानुसार आज मुरगूड शहरांमध्ये काही अनोळखी फासेपारधी संशयित लोक उतरल्याची माहिती मिळताच येथील शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते यांनी मुरगुड पोलीस स्टेशनला कॉल केला मुरगुड स्टेशनचे कर्मचारी साहेब फौजदार राजेंद्र जगत आणि पोलीस कॉन्स्टेबल हिंदुराव पाटील यांनी संशयित व्यक्तींना गाठून त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली यानुसार त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची ओळखपत्र नसल्यामुळे त्यांची नोंद करून त्यांना एकत्र करून त्यांच्यासोबत मुरगुड बस स्टॅन्ड इथे येत कोल्हापूर बस मध्ये बसवून त्यांना त्याच्या मूळ गावी सोडण्यात आले यावेळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिवभक्त आणि मुरगुड पोलिसांच्या सजगतेमुळे त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात यश आले याबद्दल शहरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, रघुनाथ बोडके, ओंकार पोतदार जगदीश गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

No comments: