Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रथमेश अरूण जत्राटे-पाटील.

प्रथमेश अरूण जत्राटे-पाटील.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी

आशिष पाटील 

------------------------------------------

चंदेरी नगरी हुपरीशहरचे प्रथमेश अरूण जत्राटे पाटील हे श्री आण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षांत वैद्यकीय शिक्षण घेत असून राज्यस्तरीय पंचभौतिकप्चिकित्सा या विषयावर सादर केलेल्या   निबंधास तृतीय क्रमांक पटकाविल्यानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या अमृत हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रथमेश अरूण जत्राटे पाटील यांना नॅशनल फिजिऑलॉजी कॉन्फरन्स मध्ये बेस्ट पेपर प्रेझेंटेशन ॲवाॅर्ड  मिळाला आहे.

तसेचमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकयेथे आयोजित केलेल्या अविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन 2023 मध्ये द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.माधुरी कानिटकर याच्याकडून सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रथमेश हा प्रसिद्ध चांदी व्यवसायीक श्री अरूण जत्राटे पाटील यांचा चिरंजीव असून श्री आण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय आष्टा या महाविद्यालयात बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षांत वैद्यकीय शिक्षण घेत असून पहिल्या वर्षांपासूनच वनौषधी रिसर्च करणे,पेपर सादरीकरण करणे,शोध निबंध प्रेझेंट करणे  या साठी आपली पॉझिटिव्ह एनर्जीचा वापर करत आहे हे कौतुकास्पद आहे.

श्री समर्थ नेचरक्युअर क्लिनिक व फाऊंडेशन भगवा चौक शिवाजीनगर हुपरीशहर यांचेकडून प्रथमेश यांचे मा.डॉ. प्रदिपकुमार शिंदे साहेब मनपूर्वक अभिननंदन केले

Post a Comment

0 Comments