Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

 शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

----------------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

----------------------------------------- 



करवीर तालुक्यातील शिये  येथे परप्रांतीय अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना आज गुरुवारी  उघडकीस आली आहे. तिचा मृतदेह शिये येथील रामनगर परिसरातील शेतामध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

     अधिक माहिती अशी की,करवीर तालुक्यातील शिये येथील रामनगर येथे परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे.बुधवारी सायंकाळी त्यांची मुलगी बेपत्ता झाली होती.त्यांनी बराच वेळ शोधाशोध केली,पण ती आढळुन आली नाही. त्यानंतर त्यांनी रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात मध्ये याबाबतची फिर्याद दिली होती.

आज दुपारी एक च्या सुमारास रामनगर येथील एका हॉटेल लगत असलेल्या शेतामध्ये या मुलीचा मृतदेह आढळुन आला.मृतदेह पाहिल्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. घटनास्थळावरचे दृश्य अंगावर शहारा आणणारे होते.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटना समजल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय  तपासणी साठी पाठवण्यात आला. प्राथमिक माहिती नुसार या मुलीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले आहे.एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.बदलापूर ची घटना ताजी असताना अशी घटना कोल्हापूरात घडल्याने नागिरकांच्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन  तपास स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments