तालुकास्तरीय शाहिरी पोवाडा गायन स्पर्धेत भणंग शाळेचे घवघवीत यश.

 तालुकास्तरीय शाहिरी पोवाडा गायन स्पर्धेत भणंग शाळेचे घवघवीत यश.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

भणंग प्रतिनिधी 

चंद्रशेखर जाधव

---------------------------------------

जिल्हास्तरीय पोवाडा गायन स्पर्धेसाठी भणंग शाळेची निवड.

       सातारा जिल्हा परिषद सातारा यांचे वतीने आयोजित तालुकास्तरीय स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धेत शाहिरी पोवाडा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भणंग येथील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.

     मोठ्या गटात बाल शाहिर विराज साळुंखे, आयुष जाधव, विराज जगताप, तनिष्का देशमुख, समृद्धी जाधव, पौर्णिमा चव्हाण, रिषा लोहार, निकीता चव्हाण, श्रेयश क़ाेंड़े यांनी उत्तम सादरीकरण केले. पोवाडा गायनास संगीत साथ हार्मोनियम वादक श्री. डी. टी . धनावडे तसेच ढोलकी सम्राट भगवान सुतार मोहाटकर यांनी दिली. उत्कृष्ट सादरीकरण करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

        भणंग शाळेची सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शाहिरी पोवाडा गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

       या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक डी.टी. धनावडे, अशोक लकडे,आशा साळुंखे , शंकर ओंबळे, विश्वास भिसे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. 

           भणंग शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पोवाडा गायन स्पर्धेत मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल जावलीचे गटशिक्षणाधिकारी मा. संजय धुमाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख अरविंद दळवी, भणंगचे सरपंच गणेश जगताप, उपसरपंच हाफीजा मोमीन, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा रेश्मा जाधव आदि मान्यवरांसह शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भणंग,पालक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.