Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगरात विटंबना करणारा फलक शिवसैनिकांनी हटवला त्या व्यापाऱ्याचाही केला निषेध.

 गांधीनगरात विटंबना करणारा फलक शिवसैनिकांनी हटवला त्या व्यापाऱ्याचाही केला निषेध.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------------------

गांधीनगर देव-देवतांच्या प्रतिमा लावून 'येथे कचरा टाकू नये' असा फलक गांधीनगर ग्रामपंचायतच्या नावाने लावणाऱ्या एका व्यापाऱ्याचा संतप्त ग्रामस्थ, शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. हा फलक त्या व्यापाऱ्याकडून काढायला लावण्यास भाग पाडले.

 देव-देवतांची विटंबना केल्याबद्दल शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, वळीवडेचे ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ गुरव आणि संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येऊन या व्यापाऱ्यास जाब विचारला. गांधीनगर ग्रामपंचायतच्या सदस्यांनाही घटनास्थळी बोलावून याबाबत विचारणा केली. त्यावेळी असा फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतने कोणतीही परवानगी संबंधित व्यापाऱ्याला दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्यापाऱ्याने परस्पर हा फलक लावलेला असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

देवदेवतांच्या प्रतिमा असलेले फलक लावून त्यांची विटंबना यापुढे झाली तर ते सहन केले जाणार नाही. संबंधिताला शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा राजू यादव यांनी दिला. फलक लावणाऱ्या व्यापाऱ्याने याबाबत माफी मागून अशी घटना परत घडणार नाही, असे सांगितले. अशाप्रकारे कोणी जर देवदेवतांची विटंबना करत असेल तर पोलिसांनी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणीही करवीर शिवसैनिकांनी केली.

.....फोटो ओळी...

गांधीनगर येथे देव-देवतांची विटंबना करणारा फलक लावल्याबद्दल व्यापाऱ्यास जाब विचारताना राजू यादव, वैजनाथ गुरव आदी.

Post a Comment

0 Comments