Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राम मंदिर : महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय.

 राम मंदिर : महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय.

 ------------------------------------------ 

सातारा प्रतिनिधी 

 अमर इंदलकर

----------------------------------------

राम मंदिर : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडूनही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. 

राम मंदिर : 

मुंबई : महाराष्ट्रतही 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या  उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


कोणत्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर-----


याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. त्यानुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीगड या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये.  राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानुसार अनुष्ठान देखील करण्यात येत आहे. बुधवार 17 जानेवारी रोजी कलश पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रामलल्लाच्या मूर्तीला गुरुवारी गर्भगृहात आणण्यात आले. रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यापूर्वी विशेष पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हे अनुष्ठान 21 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. तसेच हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत समाप्त होणं अपेक्षित आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आले आहे.


केंद्र सरकारकडून हाफ डे देण्याचा निर्णय


अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्माचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.--------

सलग चार दिवस सुट्या


हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, 25 जानेवारी रोजी बँकेला सुट्टी असणार आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 26 जानेवारीला बँका बंद राहतील. 27 जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि त्यानंतर 28 जानेवारी रविवार आहे. 25 जानेवारी ते 28 जानेवारी असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 21 जानेवारीपासून पुढील आठ दिवस बँका फक्त 2 दिवस सुरू राहतील आणि 6 दिवस सुट्या असतील.

Post a Comment

0 Comments