पुणे कोथरूड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दहशतवाद्याना पकडून बॉम्बस्फोटाचा कट उधळला.
पुणे कोथरूड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दहशतवाद्याना पकडून बॉम्बस्फोटाचा कट उधळला.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------------------
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तत्पर कामगिरी केल्याबद्दल रोख दहा लाखांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान.
पुणे: कोथरुडमध्ये दुचाकी चोरताना दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या तत्परतेमुळे देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव उधळला गेल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) कोथरुड पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना दहा लाखांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र प्रदान केले.
एनआयएचे अधिकारी इंगवले आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया आदी उपस्थित होते. कोथरुड पोलीस ठाण्यातील अमोल नजन, प्रदीप चव्हाण, बाला रफिक शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक नीलीमा पवार यांना गौरविण्यात आले
Comments
Post a Comment