मित्रमेळा फाउंडेशन व शिंदे महाविद्यालयाकडून कळंबेत नदीस्वच्छता मोहीम.
मित्रमेळा फाउंडेशन व शिंदे महाविद्यालयाकडून कळंबेत नदीस्वच्छता मोहीम.
-----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
-----------------------------------------
मेढा,ता.१०: मित्रमेळा फाउंडेशन व आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या माध्यमातून बुधवार (ता.१०) रोजी कळंबे ता. सातारा येथे नदीस्वछता प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमदरम्यान कळंबे येथील वेण्णा नदीतीराची स्वच्छता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व संस्थेच्या सदस्यांनी केली..
मित्रमेळा फाउंडेशन ही संस्था जावली तालुक्यातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असून पर्यावरणाच्या विषयावर या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच विविध उपक्रमांचा भाग असलेल्या नदीस्वच्छता प्रकल्पाचे आयोजन मित्रमेळा फाउंडेशनच्या माध्यमातून व मेढ्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत कळंबे यांच्या सहकार्यातून कळंबे ता. सातारा येथे बुधवार (ता.१०) रोजी करण्यात आले होते. या उपक्रमदरम्यान कळंबे गावालगत असणाऱ्या वेण्णा नदीतीर व नदीपरिसराची स्वच्छता संस्थेच्या सदस्यांकडून तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व कळंबे ग्रामस्थांकडून करण्यात आली.
यावेळी नदीतीरावर तसेच नदीत असणारा कचरा, प्लास्टिक, बाटल्या, थर्माकोल इत्यादी प्रकारचा कचरा उपस्थितीतांनी गोळा करत नदीपरिसर स्वच्छ केला.. या वेळी सरपंच विजय इंदलकर यांनी नदी स्वच्छतेचा वसा असाच पुढे नेण्याची ग्वाही दिली
या उपक्रमास आ. शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक, मित्रमेळा संस्थेचे सदस्य तसेच कळंबे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो: कळंबे: नदीस्वछता प्रकल्पादरम्यान संस्थेचे सदस्य , आ. शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थी व कळंबे ग्रामस्थ
Comments
Post a Comment