नवी मुंबई मध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी प्रयत्न करणार... जिल्हाध्यक्ष दिलीप बंदिचोडे.

 नवी मुंबई मध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी प्रयत्न करणार... जिल्हाध्यक्ष दिलीप बंदिचोडे.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रवि पी. ढवळे सर

नवी मुंबई प्रतिनिधी

----------------------------

नवी मुंबईत आरपीआय (आ )व रिपब्लिकन सेनेच्या शेकडो कार्यकर्त्याचा वंचित मध्ये पक्ष प्रवेश.

ऐरोली :- नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिलीप बंदिचोडे यांच्याकडे आल्यापासून वंचितला ऊर्जा मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून वार्ड शाखा बांधणी पासून जिल्हा लेवल पर्यंत काम त्यांनी चालू केले आहे. त्यामुळे इतर पक्षयातील लोक वंचित बहुजन आघाडीकडे वाळल्याचे चित्र दिसून येत आहे.येणाऱ्या महापालिका निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता काबीज केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे जिल्हाध्यक्ष दिलीप बंदिचोडे यांनी सांगितले.


श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरीत होऊन वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिलीप बंदिचोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कांबळे आरपीआय रबाळे युवक विभाग अध्यक्ष (आठवले गट, आर. पी. आय.)यांच्या माध्यमातून रबाळेतील व दिघ्यातील आरपीआय व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते, तसेच वॉर्ड अध्यक्ष(आर . पी. आय) युवक दिघा विष्णू नगर दीपक दाहिजे,व सागर घोलप शिवसैनिक वाशी विभाग सेक्टर 9,10,11, जुहूगाव येथील शेकडो युवा कार्यकर्ते तसेच इस्माईल छप्परबंद वाशी कोपरी वॉर्ड 57 मधील अनेक कार्यकर्त्यांनीं वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला.


 यावेळी पक्षामधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष वाढी आपले मनोगत व्यक्त केले.पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी व दोन्ही तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव गौतम शिलवंत यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.