Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अर्जुन घोडे पाटील यांची बदली रद्द करा.गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांची मागणी.

 अर्जुन घोडे पाटील यांची बदली रद्द करा.गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांची मागणी.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

---------------------------------

गांधीनगर बाजारपेठे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कपड्याची बाजार पेठ म्हणून ओळखली जाते.

या बाजार पेठ मध्ये गांधीनगर पोलीस ठाणे असुन सहा महिन्यांपूर्वी या पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अर्जुन घोडे पाटील याची नेमणूक करण्यात आली

गांधीनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार अर्जुन घोडे पाटील यांनी स्विकारल्यानंतर सहा महिन्यांत 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आपल्या कामांची चूणुक दाखवली गांधीनगर मधे  वाहतूक  कोंडीचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होता. ती येथील व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या समन्वयातून व्यवस्था सुरळीत लावली तावडे हॉटेल  व उचंगाव पुलाखाली रहदारी सुरळीत करत वाहतूक व्यवस्थेला वळण लावले . गांधीनगरला नेहमी भेडसावणारी ट्रॅफिक जॅम ची समस्या ही कमी केली आहे. उंचगाव मधील गणेश विसर्जन मिरवणूक कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिध्द आहे त्या ऐतिहासिक मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त लावून मिरवणुकीस कायदा सुव्यवस्थेचे नियम लावल्याने ती मिरवणूक आदर्श ठरली. न्यू वाडदे मध्ये मंडळाच्या घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मीटिंगमध्ये डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे करवीर पूर्व भागातील पहिले न्यू वाडदे डॉल्बी मुक्त गणेश उत्सव म्हणून नावाजले.  (शासनाच्या नियमाप्रमाणे मिरवणूक शांततेत पार पाडून एक वेगळाच पांयडा व आदर्श निर्माण केला) गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणारे किरकोळ वाद विवाद फाळकोट दादांचा उच्चाद यांच्यावर वचक ठेवून कायदा सुव्यवस्था अबाधित राखली. त्यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी झाले .या पुर्वीच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्याच्या कारकीर्द मध्ये तब्बल 140 घरफोड्या झाल्या होत्या त्याचा आज तागायत सुगाव लागलेला नव्हता पण अल्पावधीतच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या अशा कर्तव्यदक्ष  अधिकाऱ्याची बदली झाली . त्यामुळे व्यापारी सामाजिक क्षेत्रात वेगळीच चर्चा सुरू आहे. 

  प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होत आहे त्यामुळे गांधीनगर परिसरातील नागरिकांमधून चर्चा  व्यक्त होत आहे. अशा अधिकार्‍याची अल्पावधीत बदली झाल्यामुळे शिस्त लागलेल्या गांधीनगर परिसराला पुन्हा एकदा ग्रहण लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

0 Comments