एकट्याने नाही तर एकीनेच सर्वागीण विकास.
एकट्याने नाही तर एकीनेच सर्वागीण विकास.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------------
केशवनगरपासून जवळच असलेल्या आदर्श ग्राम ढोरखेडा येथे राष्ट्रमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती व महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पु.अहिल्यामाई होळकर युवा प्रतिष्ठान व मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने एक दिवसीय प्रबोधन प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले .या प्रशिक्षण शिबिराचे उद्घघाटन सामाजीक कार्यकर्ते डाॅ गजानन हुले यांनी तर अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम ढोरखेडच्या सरपंच सौ.सुनीताताई बबनराव मिटकरी या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभिम माथेले होते माथेले यांनी महामानवाच्या महानायीकांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना विकास एकीने कार्य केल्यास विकास साधला येतो असे सांगितले. अभ्यासपूर्ण मांडणी करत पाच तास उपस्थितांना अवलोकन करून सामाजीक कार्य करण्याची प्रेरणा दिली .
प्रास्ताविक प्रा. राजकुमार नव्हाळे यांनी केले.डाॅ गजानन हुले यांनी राजकीय जागृती बाबत विवेचन केले .समाजातील युवकांनी सर्व आघाड्यांवर काम केले पाहीजे ही भूमिका मांडली .
आदर्श ग्राम ढोरखेडा च्या प्रगतीची चित्रफीत दाखवण्यात आली . मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य,मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून अमोल जुंगाडे यांना नियुक्ती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कैलास मिटकरी यांनी,
तर आभार संदीप मिटकरी.यांनी मानले .
मौर्य क्रांती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कुटे , विदर्भ प्रभारी शिवाजी वैद्य,विदर्भ अध्यक्ष राजकुमार नव्हाळे,तसेच जि.प.सदस्य डीगांबर खोरणे , बबनराव मिटकरी ,डाॅ गजानन हुले , डॉ किसनराव हुले, दिपकराव तिरके कडूजी मिटकरी, महादेव लांभाडे,अभिषेक मिटकरी,गुंधा येथील सरपंच आश्रुजी फुके, एम.काळदाते,मा. विठ्ठल जटाळे, मा केशव जटाळे, मा गजाननराव इंगळे (सरपंच कोठा),रविभाऊ फुकें,.गणेश गावंडे , धनगर समाज बांधव सह बहुसंख्य बहुजन समाज बांधव महिला,युवा,विद्यार्थी यांची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती.
Comments
Post a Comment