शाहूवाडी तालुक्यातील घुंगुर शाळेची विद्यार्थिनी रिया पाटील ही कथाकथनात जिल्ह्यात प्रथम.
शाहूवाडी तालुक्यातील घुंगुर शाळेची विद्यार्थिनी रिया पाटील ही कथाकथनात जिल्ह्यात प्रथम.
------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------------------
शाहुवाडी: जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षण विभाग( प्राथमिक) आयोजित जिल्हास्तरीय झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन मध्ये शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर घुंगुर शाळेची विद्यार्थिनी कु. रिया बाजीराव पाटील हिने वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिने सर्वांचीच वाहवा मिळवली आहे. तिला तिच्या यशाबद्दल तिच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. उत्तम वरेकर सर, श्री. कृष्णात डोंगरे सर, सौ. संगीता पाटील मॅडम,श्री.चंद्रकांत मुगडे सर,सौ.आफरीन पटेल मॅडम, श्री. प्रशांत कुलकर्णी सर व आई वडील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या या यशाबद्दल तिचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment