वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या संधी -मा. प्रविणा ओसवाल.
वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या संधी -मा. प्रविणा ओसवाल.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
-------------------------------
किसन वीर महाविद्यालयामध्ये वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान
वाई दि. २० आपला भारत देश औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कौशल्ये जर विद्यार्थ्यांनी आत्मसात केली, तर वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी आहेत. असे प्रतिपादन सातारा येथील पी. एन. ओसवाल अँड कंपनीच्या प्रवर्तक सीए प्रविणा ओसवाल यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या प्राचार्य डॉ गुरूनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी निलया एज्युकेशन ग्रुपचे समुपदेशक चेतन गोडबोले, निलया एज्युकेशन ग्रुपचे समन्वयक साईनाथ ढगे, कला शाखेचे उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख प्रा . डॉ. सुनिल सावंत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य व भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद वीर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सीए प्रविणा ओसवाल यांनी आपल्या भाषणातून सी.ए., सी.एस., सी.एम.ए. या कोर्ससंदर्भात माहिती दिली. श्री. चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्ये व व्यक्तिमत्व विकास कौशल्ये कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक आहेत असे मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक कोर्सेसची माहिती प्रात्यक्षिक स्वरूपात करून दिली. बी. कॉम. शाखेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे अधिक चांगली कौशल्ये असतील किंवा जे ही कौशल्य स्वतःमध्ये विकसीत करतील त्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळण्यासाठी अनेक उत्तम सामाजिक माध्यमे व ग्रंथालयाचा चांगला उपयोग होऊ शकतो असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक जयवंत पवार यांनी केले. प्रमुख वक्त्यांची ओळख दिपाली चव्हाण यांनी करून दिली. सुत्रसंचालन चंद्रिका साबळे व श्रृती यादव यांनी केले. संदीप पातूगडे यांनीआभार मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उoपस्थित होते.
Comments
Post a Comment