कुंभी कासारी कारखान्यावर राम मंदिरात उत्सव साजरा.
कुंभी कासारी कारखान्यावर राम मंदिरात उत्सव साजरा.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------
कोपार्डे - कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यावर असणाऱ्या राम मंदिर मध्ये आज दिवसभर भजन कीर्तन व प्रसाद वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडली अयोध्येतील राम मंदिर मध्ये राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कुंबी कासारी परिसरातील सर्व गावातून राम भक्तांनी आज येथे हजेरी लावली होती.
आज सकाळी काकड आरती त्यानंतर उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या मूर्तींना
दुग्ध अभिषेक घालण्यात आला यानंतर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्र नरके यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तत्पूर्वी भजन कीर्तन व रामनामाचा जप असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज राम मंदिर रामभक्त आणि फुलून गेले होते.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक भागातील राम भक्त पुरुष महिला यांची मांदियाळी राम मंदिरात हजर होती.
फोटो
कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके,उपाध्यक्ष विश्वास पाटील कुडित्रे सरपंच जोत्स्ना पाटील सर्व संचालक सभासद
Comments
Post a Comment