Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात दुचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

 अज्ञात दुचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

------------------------------------------

गांधीनगर, ता.१५ः उचगाव गडमुडशिंगी रस्त्यावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत मोटारसायकलस्वार विजय कुमार सुतार (वय ४८, रा. उजळाईवाडी) यांचा मृत्यू झाला. 

याबाबतची माहिती अशी की, सायंकाळी सहाच्या सुमारास उचगाव गडमुडशिंगी रस्त्यावर गडमुडशिंगीक़डून विजय हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच ०९ - बीटी - २७५० येत होते. त्यावेळी अज्ञात मोटारसायकलला त्यांची धडक बसली. त्यानंतर विजय हे जखमी झाले. यानंतर अज्ञात मोटारसायकलस्वार पळून गेले. रुग्णवाहिकेतून विजय यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रात्री उशिरा गांधीनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

----------

Post a Comment

0 Comments