अध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे हार्ट अटॅक टाळणे शक्य.... डॉ रतन राठोड

 अध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे हार्ट अटॅक टाळणे शक्य.... डॉ रतन राठोड.

--------------------------------------------

प्रतिनिधी रणजीत ठाकूर 
---------------------------------------------

येथील स्व अप्पासाहेब सरनाईक सभागृह शिवाजी विद्यालयात रविवार दि 21जानेवारीला सकाळी 10 वाजता प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, डॉक्टर्स असोसिएशन, लॉयन्स क्लब व मेडिकल असोसिएशन रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथिल एम जी मेडिकल कॉलेज चे हेड कॉर्डीयॉलॉजिस्ट डॉ रतनजी राठोड यांच्या हृदय संबंधित समस्या व उपाय यावर मार्गदर्शन करणारा बाय बाय हार्ट अटॅक हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यस्थानी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी मुख्य संचालिका ब्रह्माकुमारीज अकोला वाशीम, उदघाटक देवेंद्रसिंग ठाकूर पोलीस निरीक्षक, प्रमुख वक्ता डॉ रतनजी राठोड, प्रमुख अतिथी डॉ. अरुणजी देशमुख अध्यक्ष डॉ. असोसिएशन, डॉ माधवजी मस्के अध्यक्ष लॉयन्स क्लब,हरिभाऊ खोडके अध्यक्ष मेडिकल असोसिएशन, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी संचालिका ब्रह्माकुमारीज रिसोड,प्रा.संजय देशमुख प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय इत्यादी मान्यवर मंच्यावर उपस्थित होते. ब्रह्माकुमारीज विद्यालयाकडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कु..... स्वागत नृत्य सादर केले.ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी स्वागत भाषण केले. प्रास्ताविक ब्रह्मा कुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी केले. उदघाटक म्हणून मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांनी ब्रह्माकुमारीज परिवारासह डॉक्टर्स, लॉयन्स, व मेडिकल असोशियशन ने आयोजित केलेल्या आरोग्य विषयक कार्यक्रमांची प्रसंशा करून आजच्या परिस्थितीनुरूप जनजागृती करून अनेक बिमारीपासून संरक्षण करता येणे शक्य आहे.डॉ. रतन राठोड यांचा परिचय डॉ नानाराव अवचार यांनी करून दिला. डॉ रतनजी राठोड यांनी मार्गदर्शन करताना सद्य स्थितीत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅक ने होत असल्यामुळे हा विषय चिंतेचा आणि चिंतानाचा झाला आहे. हार्ट अटॅक टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात काही सकारात्मक बदल घडवून आणून अध्यात्मिक ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.मानसिक, शारीरिक, सामाजिक दृष्ट्या सक्षम असणारी व्यक्ती निरोगी समजली जात होती परंतु बदललेल्या परिस्थिती नुसार आज अध्यात्मिक दृष्ट्याही सक्षम असेल तरच आरोग्य टिकवून ठेवणे शक्य आहे.कौटुंबिक कलह,ताण तणाव, व्यर्थ चिंता, एकलकोंडेपणा, ईर्षा, द्वेष, अनावश्यक स्पर्धा, मोह, व्यसन इत्यादी हार्ट अटॅक चे प्रमुख कारणे आहेत. हार्ट अटॅक वर अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत मात्र त्या सर्व अल्पशा आणि तात्पुरत्या आहेत. हार्ट अटॅक आल्यावर उपचार करणे ही आर्थिक आणि शारीरिक रूपाने न परवडणारी बाब आहे. हार्ट अटॅक येऊच नये म्हणून रोजच्या जीवनात सकारात्मक विचार करण्याची व खानपान यावर नियंत्रण ठेवून अध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. ब्रह्माकुमारीज कडून शिकविला जाणारा राजयोग हे अध्यात्मिक ज्ञानाचे व स्व उन्नतीचे साधन आहे. त्यामुळे नजीकच्या ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात जाऊन राजयोग समजून घेण्याचे आवाहन डॉ. राठोड यांनी केले. दोन तास चाललेल्या  मार्गदर्शन शिबिरात सर्व श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.डॉ. रतन राठोड यांच्या मार्गदर्शनाचा मागोवा डॉ. अरुणजी देशमुख यांनी घेतला व डॉ राठोड यांनी अतिशय सोप्या भाषेत हार्ट अटॅक ची कारणे आणि त्यावरील उपाय अतिशय समर्पक व मार्मिक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. डॉ. अरुण देशमुख यांनी या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी गीता दीदी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विजयप्रसाद तिवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ माधव मस्के, डॉ नंदकिशोर रंजवे, डॉ अमोल नरवाडे,डॉ रामानंद गट्टनी, डॉ. राजेंद्र बबेरवाल,डॉ.तिवारी लॉ. संतोष वाघमारे, अनंत देशमुख सचिव मेडिकल असोसिएशन, पत्रकार राजू नेव्हूल,गजानन बाजड, सुरेश गिरी रुपेश बाजड इत्यादी सह ब्रह्माकुमारीज परिवारातील ज्ञानार्थी नी महत्वपूर्ण सहकार्य केले.कार्यक्रमाला रिसोड तालुक्यातील वैद्यकीय, शैक्षणिक,पत्रकारिता, राजकीय,क्षेत्रातील गनमान्य व्यक्तींची जेष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.