राधानगरी तालुक्यातील शिक्षकांची कामगीरी अग्रेसर.ए.वाय.पाटील.
राधानगरी तालुक्यातील शिक्षकांची कामगीरी अग्रेसर.ए.वाय.पाटील.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
गांधीनगर प्रतिनिधी
अनिल निगडे
----------------------------------
संपूर्ण राज्यात राधानगरी, भुदरगड, आजरा, हे तालुके स्पर्धा परीक्षेत अग्रेसर आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्यातील शिक्षकांची कामगिरी अग्रेसर आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. सरवडे ता. राधानगरी येथे प्रा. एम. आर. देसाई शिक्षक सह. पत संस्था मर्या., राधानगरी यांचे वतीने आयोजित जाहिर सत्कार गुणगौरव कार्यक्रमात श्री. पाटील अध्यक्ष पदावरून बोलत होते. समारंभास आमदार प्रकाशराव आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे मॅनेंजर एकनाथ मा. पाटील (पत्रकार) यांनी ३५ वर्ष उत्कृष्ठ सेवा करून निवृत्त झालेबद्दल त्यांचा सपत्निक यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध स्पर्धा मार्गदर्शक शिक्षक, अमृतमहोत्सवी व सेवानिवृत्ती शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, संभाजी बा. पाटील आदि ची भाषणे झाली. कार्यक्रमास गोकुळ संचालक आर. के. मोरे, राधानगरीच्या मा. सभापती सोनाली पाटील यावेळी संजय गांधी समिती अध्यक्ष अरुणराव जाधव, माजी उपसभापती वनिता पाटील, सोनाली पाटील, राजाराम वरुटे, संभाजी बापट सरवडेचे सरपंच रणधिरसिंह मोरे, सरवडे देवस्थान समितीचे अध्यक्ष मारूती ल. पाटील यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे नेते, प्रतिनिधी यांच्यासह प्रमुख मान्यवर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे चेअरमन राजाराम नारिंगकर यांनी केले. व्हा. चेअरमन शुभांगी डवरी यांनी आभार मानले
फोटो ओळी - सरवडे येथे शिक्षक पत संस्था सभागृहात मॅनेंजर मॅनेंजर एकनाथ मा. पाटील (पत्रकार) यांचा सपत्निक यथोचित सत्कार करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळ संचालक आर. के. मोरे, अरुणराव जाधव, राजाराम वरुटे आदि मान्यवर
Comments
Post a Comment