शाहुवाडी तालुक्यातील ओकोली येथे झालेल्या अपघातात एक जण ठार तर एकजण जखमी.
शाहुवाडी तालुक्यातील ओकोली येथे झालेल्या अपघातात एक जण ठार तर एकजण जखमी.
----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
----------------------------------------------
शाहुवाडी: ओकोली येथील बटरफ्लाय शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील विकास महीपती पाटील वय वर्ष ३६ रा.माण हा युवक जागीच ठार झाला असून दुसऱ्या दुचाकी वरील युवक अनिल दगडू पाटील रा. ओकोली हा युवक जखमी झाला या घटनेची तक्रार समीर सुभाष पाटील यांनी शाहुवाडी पोलीसांत दिली आहे
शाहुवाडी पोलीसांतून मिळालेल्या माहिती नुसार अनिल दगडू पाटील हा आपल्या दूचाकी वरून ओकोलीकडून शाहूवाडी कडे जात असताना निष्काळ जि पणाने गाडी चालवून समोरून येणाऱ्या इचाकीस धडक दिली या झालेल्या अपघात विकास महीपती पाटील रा .माण हा युवक जागीच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील अनिल दगडू पाटील हा जखमी झाला तसेच विकास पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत व स्वतः स जखमी केल्या बददल अनिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे या घटनेचा तपास शाहुवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक अमित पाटील साहेब करत आहेत
Comments
Post a Comment