छत्रपती चषक स्पर्धेत बी. बी. सी शेवडीने संघाने पटाविले प्रथम बक्षिस.

 छत्रपती चषक स्पर्धेत  बी. बी. सी शेवडीने संघाने पटाविले प्रथम बक्षिस.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

-----------------------------

क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना थरारक: नागरिकांची भरगच उपस्थिती 28 वर्षांपासून सामन्याची परंपरा कायम.

रिसोड: तालुक्यातील खडकी सदार येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी खेळण्यात आला.  यामध्ये बीबीसी शेवडी या संघाने हा सामना जिंकून छत्रपती चषक खडकी सदार 2028 व्या चषकावर आपले नाव कोरले तर दुसरे पारितोषिक जय किसान भर या संघाने पटकावले तर तिसरे पारितोषिक संकट मोचन बिबखेडा या संघाने तर  चौथे पारितोषिक अलमोमीन रिसोड या संघाने पटकावले. विजयी संघांना रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी क्रार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमित झनक  संजय शिंदे सभापती (कृ उ बा) रिसोड, राजाराम अरुण  उपसभापती (कृ उ बा) रिसोड, प्राध्यापक पंढरीनाथ चोपडे, रामेश्वर देवकर, अध्यक्ष काँग्रेस तालुका कमिटी विकास झुगरे शहराध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना,, बबन सानप संचालक कृ.उ. बाजार समिती रिसोड, रवि चोपडे (कु.उ.बा),  राम देशमुख, विवेक भुतेकर, शिद्धू अण्णा कोठुळे, गोरख भुतेकर, घनश्याम मापारी, भगवानराव चोपडे, राजूभाऊ खाबलकर उपध्यक्ष युव कॉग्रेस, सतीश गाडे, पुरुषोत्तम रंजवे, कैलास लांडगे, लक्ष्मण हागे संरपच वाडी रायताळ, रियाज भाई, गजानन गव्हाणे, मंगेश ढोणे, गजानन मापारी, राजू कोकाटे, साजिद भाई, प्रकाश चोपडे,  बळीराम चोपडे,  गजानन खडसे,  आप्पाजी शिंदे (म पो),  प्रमोद गरकळ, गोपाल मोरे, , सुनील भुतेकर, उत्तमराव झगडे' लोडूजी सदार मा. सरपंच, प्रदिप सदार प्रकाश धांडे (पो.पा) आत्माराम सदार, गजानन सदार, संदिप सदार, कैलास सदार, आदी मंडळी उपस्थीत होते. 


सामना सुरु असताना आमदार अमित झनक याना संमालोचन करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करुन खेळाडूला प्रोसाहन दिले. तसेच छत्रपती चषक मागील २८ वर्षापासून अविरत चालू असणारे पहिले चषक असून, या स्पर्धेमध्ये अंतिम सामना झाल्या नंतर  सर्व खेळाडू व प्रेक्षकान यांना स्नेहभोजन देणारे महाराष्ट्रील एकमेव स्पर्धा आहे. असे यावेळी ते म्हणाले.


या स्पर्धेत ऐकुण 36 संघाना प्रवेश देण्यात आला होता. या 36 संघामध्ये बिबीसी शेवडी या संघाने अतिशय चांगल्या प्रकारे खेळ दाखवत फायनल पर्यंत मजल मारली आणि 2028 छत्रपती चषक आपल्या नावार नोंदवला आहे. छपती चषक स्पर्धेत कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही, यांचे आयोजन कमिटीकडून काळजी घेण्यात येत असते. तसेच खेळाडून कडून सुद्धा त्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला जात असतोय. 


चौकट, 


*आमदार अमित झनक यांनी केला आयोजन कमिटीच्या वडिलाचा सन्मान*

स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजन कमिटीला स्पर्धा सुरु होण्या आधीपासून पंधरा दिवस सतत मैदानावर काम करावे लागत आसत. आपल्या कामातून वेळ काढून देत असतात. मात्र यासाठी त्यांच्या आई वडीलाकडून सुद्धा मुलांना प्रोत्साहन देण्यात येत असते.  त्यांच्या मागील काम त्यांचे वडिल पंधरा दिवस बघत असतात. त्यामुळे त्यांच्या वडिला सुद्धा येथे सत्मान करण्यात यावा असे आमदार अमित झनक यावेळी त्यांनी सुचवले.


स्पर्धा पार पाडण्यासाठी संजू भाऊ सदार मित्र परिवार व यंग बॉईज क्रिकेट संघ खडकीसदार यांनी गेल्या मागील 28 वर्षापासून अविरत असे प्रयत्न आणि परिश्रम घेत असतात चार जिल्ह्यांमध्ये नावलौकिक असणारी स्पर्धा येणाऱ्या 29 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ बाजड यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.