आम्ही भारतीय या संकल्पनेतून रिटकवली येथील महिला जाणून घेत आहेत माहिती.

 आम्ही भारतीय या संकल्पनेतून रिटकवली येथील महिला जाणून घेत आहेत माहिती.

-------------------------------

 फ्रंटलाईन महाराष्ट्र न्यूज 

जावली तालुका प्रतिनिधी 

 सुर्यकांत जाधव 

------------------------------

सविस्तर :-मौजे रिटकवली तालुका जावली येथे महिलांनी "आम्ही भारतीय" या संकल्पनेतून 'आमचे हक्क आमचा अधिकार' या संविधानिक मूल्याची कास धरून रिटकवली येथील महिलांनी एकत्र येऊन महाकाली मंदिरात महिलांनी महिलांसाठी प्रथमच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन स्वच्छता करत प्रत्येक घरासमोर व रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून सुशोभीकरण केले होते तसेच या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित महिलांना व साधन व्यक्तींना तिळगुळ देण्यासाठी तयारी देखील केली होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आम्ही भारतीय नागरिक म्हणून माणसाला सन्मानाने जगण्यासाठी संविधानाने दिलेले हक्क अधिकार तसेच संविधानाची माणूस म्हणून जन्म होण्या अगोदरची  व माणसाच्या मृत्यूनंतरही भूमिका काय ? संविधान त्याबाबत प्रत्येक नागरिकाला म्हणजेच स्त्री पुरुष यांना हक्क व अधिकाऱ्यांच्या मार्फत कसे संरक्षण देते, यांची माहिती साधन व्यक्ती अमित परीहार यांनी दिली. तसेच महिलांचे आरोग्य,महिलांचे हक्क,अधिकार, बचत गटासाठीच्या योजना, महिलांचे मानसिक आरोग्य अशा विविध विषयांवर संबधित अभ्यास करणाऱ्या साधन व्यक्तींकडून माहिती देण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे रिटकवली येथील महिलांनी "आम्ही भारतीय" संकल्पनेच्या माध्यमातून आदर्श, एकता, वैभवलक्ष्मी, या गटातील महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी अमित परिहार यांनी मदत केली. 25 ते 70 या वयोगटातील महिला कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत्या. माहिती,चर्चा, खेळ,पोस्टर या माध्यमांचा वापर करून महिलांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी महिला सरपंच सौ.मर्ढेकर,महिला सदस्य, अध्यक्ष छाया मर्ढेकर, ग्रामस्थ महिला मंडळ यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर महिलांचे आरोग्य याविषयी डॉक्टर रुचिका, डॉक्टर प्रगती, डॉक्टर प्रणिती, यांनी वेगवेगळ्या विषयांवर महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली.

यामध्ये मासिक पाळी त्या संदर्भात असणारे समज गैरसमज आणि आरोग्य याविषयी रिटकवली गावच्या डॉक्टर रुचिका यांनी सहभागी महिलांना माहिती दिली, तसेच त्यांनी शासनाची आरोग्य विषय भूमिका या संदर्भात सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टर प्रगती यांनी स्वच्छता व आरोग्य या विषयी माहिती दिली. डॉक्टर प्रणिती यांनी महिलांची जबाबदारी, त्यांची धावपळ यामुळे स्वतः कडे होणारे दुर्लक्ष, त्यातून उद्भवणारे आजार व त्यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय याची माहिती दिली. महिला समुपदेशक पुनम काळे यांनी मानसिक आरोग्य याविषयी माहिती देत महिलांशी खेळाच्या माध्यमातून चर्चा केली. सौ. प्रियांका दळवी यांनी बचत गट व महिला सक्षमीकरण याबाबत थोडक्यात महिती दिली. तर अमित परिहार यांनी "आमचे हक्क आमचा अधिकार" या संविधानिक मूल्यांची माहिती पोस्टर प्रदर्शनाद्वारे महिलांशी संवाद साधत दिली. तसेच सामाजिक कार्यकर्ते बजरंग चौधरी यांनी नदी स्वच्छता व आपले आरोग्य,याविषयी महिलांना माहिती दिली. कार्यक्रमाचा शेवट हा तिळगुळ वाटून व हळदीकुंकू या कार्यक्रमाने करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच शारदा मर्ढेकर, अध्यक्ष छाया मर्ढेकर, सचिव शुभांगी दुंदळे,आरोग्य सेविका प्रज्ञा मर्ढेकर,अंगणवाडी सेविका शशिकला गुळंबे व ग्रामस्थ महिला यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना अमित परिहार यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया मर्ढेकर यांनी केले तर आभार शुभांगी दुंदळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.