Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा गावातील मजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोक अर्पण व शुभारंभ कार्यसम्राट आमदार प्रकाशराव अबिटकर यांचे हस्ते संपन्न.

 राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा गावातील मजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोक अर्पण व शुभारंभ कार्यसम्राट आमदार प्रकाशराव अबिटकर यांचे हस्ते संपन्न.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे

--------------------------------------

पाटपन्हाळा येथे ४.६ कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ

 आम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता २ कोटी ४० लाख, नळपाणी पुरवठा योजना १ कोटी ६ लाख, आमदार फंड २० लाख, सामाजिक सभागृह १५ लाख, सुशोभिकरण ७ लाख, सामाजिक सभागृह ७ लाख, अंगणवाडी इमारत ११ लाख आदी कामांचा समावेश असून या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पाटपन्हाळा ते फेजिवडे रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित करून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल. गावातील धनगर बांधवांचे वनहक्क दाव्यांचेही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात येतील. पाटपन्हाळा येथील केटीवेअरची साईट आहे. याबाबत जलसंधारण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचीही सुरवात पुढील काळामध्ये

करण्यात येईल. जेणेकरून येथील जिरायती क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

   यावेळी गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, वनपरिक्षेत्रपाल विशाल पाटील, सरपंच संपदा पाटील, उपसरपंच यशवंत कांबळे, विलास डवर, रेश्मा पाटील, सिमा पाटील, संदीप बोडके, सुप्रिया पाटील, बाबुराव पाटील,अशोक कांबळे, बंडा पाटील, शांताराम पाटील,तानाजीराव चौगले, मोहन पाटील, शिवाजीराव चौगले, सुहास निंबाळकर, दिपक शेट्टी, विश्वास राऊत, संतोष पाटील,लक्ष्मण गिरी, संतोष पाटील, सुरेश पाटील,आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments