Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री राम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त नवी मुंबईत साजरी होणार दिवाळी.

 श्री राम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त नवी मुंबईत साजरी होणार दिवाळी.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

नवी मुंबई प्रतिनिधी

रवि पी. ढवळे 

-----------------------------------

रामचंद्र नाईक प्रतिष्ठान तर्फे श्रीराम पताका, दिपोत्सव दिवे आणि लाडू प्रसाद अभियानाचे आयोजन.....*


नवी मुंबई :- *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहना नुसार श्रीराम प्रतिष्ठापना निमित्त नवी मुंबईत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. रामचंद्र नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव नाईक यांच्यातर्फे नवी मुंबईतील प्रत्येक मंदिरात आणि घराघरात 50 हजार किलोच्या दोन लाख लाडुचे वाटप करण्यात येणार आहे. राम भक्तांकडून हे लाडू बनविण्यात येत असून नवी मुंबईत प्राण प्रतिष्ठान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येतेय......*


*यासोबतच श्री राम पताका, श्री राम झेंडे आणि दीपोत्सव दिव्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. राम भक्तांची पाचशे वर्षांची प्रतीक्षा, राम भक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पुढाकाराने साकार होत असून डोळ्यांच पारण फेडणारं सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची प्रत्येक रामभक्त जय्यत तयारी करत असून रामभक्त संजीव नाईक आणि रामभक्त संदीप नाईक यांच्या पुढाकाराने संपूर्ण नवी मुंबई भगविमय झालेय......*

Post a Comment

0 Comments