स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त टेळकी वरून माहूरगड कडे दिंडी व पालखी रवाना अंबादास पवार.

 स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त टेळकी वरून माहूरगड कडे दिंडी व पालखी रवाना अंबादास पवार.

लोहा,

--------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------

मागील अनेक वर्षापासून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा लातूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संत गोविंद बुवा मठ संस्थान टेळकी येथून श्रीक्षेत्र माहूरगड अशी पायी दिंडी व पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील सदरील दिंडी व पालखी दि. १८ रोजी गुरुवारी सकाळी टेळकी वरून माहूरगडकडे रवाना झाली.

           शिवसेनेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी टेळकी ते श्रीक्षेत्र माहूरगड अशी पायी दिंडी व  पालखी काढण्यात येते. यंदा दि. १८ रोजी गुरूवारी सकाळी माजी आ. चव्हाण यांच्या हस्ते ग्रामदैवत मारोती मंदिर, दत्त मंदिर सह इतर ग्रामदैवत यांचे पूजन आरती करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. नारळ फोडून दिंडी पालखी माहूरगड कडे रवाना झाली. प्रवासा दरम्यान ठराविक ठिकाणी मुक्काम करत दिंडी पालखी दि. २३ रोजी श्रीक्षेत्र माहुरगड येथे मुक्कामी गेल्यानंतर दि. २५ रोजी गुरूवारी सकाळी देवीची महापुजा करण्यात येणार आहे. दैनंदिन मुक्कामाच्या ठिकाणी महापुजा, पहाटे धावे विनंत्या, अर्जी, भुपाळी, आरती असल्याची माहिती दिंडी चालक तथा आयोजक बालाजी गिरी श्रीसंत गोविंद बुवा मठ संस्थान यांनी सांगितली.    

             पालखी रवाना होत असताना फटाक्यांची आतषबाजी तसेच टाळ मृदंगाचा गजर आणि मुखी दत्त नामाचा गजर निनादत होता.

       यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आ. रोहिदास चव्हाण, हरबळ मठसंस्थानचे शामगीर महाराज, रामराव पाटील जोशीसांगवीकर, माजी सरपंच भिमराव पाटील शिंदे, उपसरपंच माधवराव मोरे, व्हॉईस चेअरमन शंकरराव मोरे, माधवराव मोरे, सुनिल मोरे, सरपंच संदीप देशमुख, चंद्रकांत मोरे, भारत हंबर्डे, कैलास मोरे, साहेबराव हंबर्डे आदीसह शेकडो भाविक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.