लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक महिलेवर अत्याचार.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------
गांधीनगर:- लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या असाहयतेचा फायदा घेऊन महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोज मोतीराम मुलचंदानी (वय35 रा. गांधीनगर ता.करवीर) याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबतची फिर्याद पिडीत महिलेने दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी महिलेचा असाहयतेचा फायदा घेऊन संशयित आरोपीने मे. 2022ते डिसेंबर 23 या तारखेपर्यंत गोवा, राहत्या घरी, तसेच इतर लॉजवर नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. पीडित महिलेने लग्न करण्यासंबंधी विचारले असता त्याने उडवा उडवी ची उत्तर देत तिला नकार दिला. तसेच तिला पुन्हा लग्नाचे विचारायचे नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी मनोज मूलचंदानीवर गुन्हा दाखल झाला . संशयित अध्याप फरार आहे. त्याचा पोलीस तपास घेत असून अधिक तपास सपोनि अर्जुन घोडे पाटील करत आहेत.
0 Comments