रिसोड मध्ये नाव दर्शक दिशा फलक लावण्याकरिता तहसीलदार व उपविभागीय अभियंता यांना भाजप शहराध्यक्ष रिसोड नंदकिशोर मगर यांनी निवेदन दिले.
रिसोड मध्ये नाव दर्शक दिशा फलक लावण्याकरिता तहसीलदार व उपविभागीय अभियंता यांना भाजप शहराध्यक्ष रिसोड नंदकिशोर मगर यांनी निवेदन दिले.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकुर
--------------------------
. मधील रस्त्याच्या कडेला नाव निदर्शक फलक नसल्याकारणाने जनतेला होत असलेल्या त्रासाकरिता रिसोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तसेच रिसोड तहसीलदार तेजनकर मॅडम यांना भाजपा शहराध्यक्ष रिसोड नंदकिशोर मगर यांनी आज निवेदन दिले निवेदनामध्ये नमूद मागील अनेक वर्षापासून रिसोड मध्ये बांधकाम विभागाच्या अख्यारित्या येणाऱ्या रस्त्यावर कुठेही रिसोड शहर किंवा रिसोड शहरांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दिशा फलक न लागल्यामुळे बाहेरगावावरून किंवा बाहेरच्या जिल्ह्यामधून येणारे अनेक जड वाहने गुगल मॅप वरून थेट रिसोड शहरामध्ये घुसतात आणि मुख्य चौकामध्ये आल्यानंतर त्या जड वाहनाला पलटविण्याकरिता जागाच नसते किंवा बाहेरगावावरून ज्या लोकांना लोणार किंवा अकोल्यावरून आल्यानंतर त्यांना हिंगोलीला किंवा नांदेडला जायचं असले तर गुगल मॅप हिंगोली चा रस्ता हा रिसोड मधून दाखविल्याकारणाने त्यावर त्यांना त्या प्रवाशांना रिसोड मध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहन टाकल्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागतो त्यातल्या त्यात मागील दोन महिन्यात रिसोड मध्ये जे दुर्दैवी अपघात झाले त्याचे कारण सुद्धा दिशा फलक किंवा डीवाईडर हेच मुख्य कारण असू शकते त्याकरिता वाशिम वरून येताना हिंगोली नाका येथून हिंगोली कडे जाण्याला मार्ग तसेच रिसोड शहरांमध्ये जाणारा मार्ग आणि लोणार कडे किंवा अकोल्याकडे जाणारा मार्ग दर्शक फलक लावण्याची मागणी जनतेकडून होत आहे तरी आपणास नम्र निवेदन देतो की वाशिम ते रिसोड रोड मधील हिंगोली नाका येथे दुतर्फा दिशादर्शक गावदर्शक फलक लावावे तसेच मालेगाव नाका येथे सुद्धा मेहकर कडे जाण्याचा मार्ग लोणार कडे जाण्याचा मार्ग आणि हिंगोली कडे जाण्याचा मार्ग असे नाम निर्दशक फलक तात्काळ लावण्यात याकरिता निवेदन देण्यात आले अति लिपी मध्ये जिल्हा अधिकारी मॅडम व कार्यकारी अभियंता यांना सुद्धा निवेदन पाठविण्यात आले निवेदन देतानी भाजपा शहर अध्यक्ष नंदकिशोर. मगर भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सानप भाजपा तालुका सरचिटणीस सुनील भाऊ बेलोकर ,भाजपाचे मंचकराव देशमुख सह रिसोड भाजपा महामंत्री महादेवराव पवार व भाजपा शहर उपाध्यक्ष दीपकजी गिराम भाजपाचे धनंजय मानवतकर रणजितसिंह ठाकूर कैलास महाजन हजर होते.
Comments
Post a Comment