नगरपरिषद ने हटवल्या त्या अनाधिकृत पाट्यादुभाजकाने घेतला मोकळा श्वास.

 नगरपरिषद ने हटवल्या त्या अनाधिकृत पाट्यादुभाजकाने घेतला मोकळा श्वास.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकुर

-------------------------------

 येथील सर्वात महत्त्वपूर्ण असलेला वाशिम नाका ते मालेगाव नाका व तसेच कालुषा बाबा दर्गा ते वाशिम नाकापर्यंतच्या रस्ता दुभाजकावर लावलेल्या विविध दुकाने, प्रतिष्ठाने, कार्यालय, दवाखाने, चौक, रस्ते, नगर चे नाव फलक इत्यादी अनाधिकृत पाट्या अखेर नगर परिषद ने हटविल्या आहेत सदर पाट्या हटविल्यानंतर आता या रस्त्याने मोकळा श्वास घेताला आहे या पाट्या लावण्याची जणू शर्यतच लागली होती तसेच या पाट्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दररोज किरकोळ अपघात होत होते रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेल्या पाट्या काढण्याची मागणी प्रवाशासन नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती नगरपरिषदेने या संदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासोबत तातडीची बैठक घेऊन सदर पाट्या हटवण्याचा निर्णय घेतला या पाट्या संदर्भात समाज माध्यमावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती हि बाब नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्यानंतर सदर पाट्या हटवण्यात आल्या. दिनांक 17 जानेवारी रोजी नगरपरिषद चे आरोग्य विभाग निरिक्षक प्रतापराव देशमुख यांच्या नेतृत्वात सदर पाट्या हटवण्यात आल्या. नगरपरिषद ने यापूर्वीच सदर पाट्याच्या मालकांना सुचित करून त्या पाट्या काढून घेण्याचे सांगितले होते. यामध्ये काही मोजके दुकानदारांनी नगर परिषदेच्या या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतः पाट्या काढून घेतल्या होत्या मात्र ज्या दुकानदारांनी सदरपाट्या काढल्या नाहीत अशा पाट्या नगरपरिषद ने हटवल्या सदर पाट्या हटवल्यानंतर आता दुर्घटना होण्याची भीती राहिलेली नाही. पाट्या होत्या त्यावेळेस रस्ता ओलांडताना पाट्यामुळे समोरचे वाहन दिसत नव्हते. या व्यतिरिक्त रस्ता अत्यंत अशोभनीय व विचित्र दिसून येत होता. यामुळे आता या समस्ये पासून सुटका मिळाली असून रस्ता व दुभाजकाने आता मोकळा श्वास घेतला आहे बांधकाम निरीक्षक माणिक भागवत, आरोग्य विभागाचे दरोगा अब्दुल जमील व इतर कर्मचाऱ्यांनी सदर मोहीम राबवली. *प्रतिक्रिया*. :--शहरातील आस्थापनाच्या पाट्या रहदारीस अडथळा व सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असलेल्या नगर परिषद.हटविलया. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, सोयीस्कर प्रवास करता येईल:--- सुनील भाऊ बेलोकार भाजपा नेते रिसोड

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.