रिसोडच्या भव्य शोभा यात्रेत सहभागी हजारो राम भक्तांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण.

 रिसोडच्या भव्य शोभा यात्रेत सहभागी हजारो राम भक्तांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण.

ना भूतो ना भविष्य शोभायात्रा,रिसोड राममय.
उपस्थित हजारो राम भक्तांचे नकुल देशमुख यांनी मांनले आभार.
रिसोड ... प्रतिनिधी रणजीत ठाकूर..

-----------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रंजीत सिंह ठाकुर
-----------------------------------------------------------------

रिसोड येथे आयोध्या येथे मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने आयोजित भव्य शोभायात्रा हजारोंच्या भक्तांच्या साक्षीने पार पडली.

रिसोड नगरी अक्षरशा राममय झाली होती. असंख्य भगव्या पताका, सुंदर असे राम मंदिर प्रतिकृती, भजनी मंडळ, लेझीम पथक, बँड पथक सोबतच विविध कलाकृती या भव्य शोभा यात्रेदरम्यान होत्या एक प्रकार आयोध्या येथेच असल्याचा भास कृषिवट नगरीतल्या व परिसरातील हजारोंच्या संख्येने आलेल्या प्रभू श्रीराम भक्तांना अनुभव येत होता भविष्य अशी भव्य शोभायात्रा रिसोड नगरीत पार पडली. या सर्व यात्रेदरम्यान पूर्ण शहरात भाजप नेते नकुल दादा देशमुख उपस्थित होते त्यांनी केलेल्या आवाहनानंतर रिसोड शहर तालुका व इतर परिसरातून हजारोंच्या संख्येने लोकांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. भाजप नेते नकुल दादा देशमुख यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या मित्रपरिवारास सूचना केल्या होत्या तसेच या शोभा यात्रेत होणाऱ्या सर्व सादरीकरणावर कलाकृतीवर अतिशय बारकाईने लक्ष देऊन अतिशय उत्तम सादरीकरण कसे होईल याकडे त्यांनी स्वतः वेळोवेळी आढावा घेतला होता त्याचे फलित म्हणून हा भव्य दिव्य शोभायात्रा मोठ्या प्रमाणात हजारोच्या साक्षीने संपन्न झाला. जिजामाता चौक येथून भाजप नेते नकुल दादा देशमुख व मान्यवरांच्या रस्ते भगव्या ध्वज फडकवून सदर शुभ रात्रीची सुरुवात झाली सिविल लाईन मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोनार गल्ली जैन मंदिर अष्टभुजा देवी चौक अप्पा स्वामी महाराज चौक व शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महा आरती नकुल दादा देशमुख, ॲड माझोडकर साहेब कृष्णाजी आसनकर हजारोच्या संख्येने महाआरती करून व प्रभू श्रीराम करून या भव्य शोभा यात्रेची सांगता झाली ना भूतो ना भविष्य अशी ही भव्य शोभायात्रा सुरुवात झालेल्या स्थळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जिथे महा आरती संपन्न होणार होती. तिथं पर्यंत प्रभू श्रीराम भक्त उपस्थित होते. संपूर्ण शोभा यात्रेच्या नंतर ॲड नकुल देशमुख यांनी उपस्थित हजारो राम भक्तांचे आभार व्यक्त केले व त्यांना धन्यवाद दिले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.