वाघेश्वर हायस्कुल मध्ये स्पर्धा परिक्षा.
वाघेश्वर हायस्कुल मध्ये स्पर्धा परिक्षा.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
----------------------------------
केंजळ गावचे माजी सरपंच कै.यदू महादेव केंजळे यांच्या स्मरणार्थ वाधेश्वर हायस्कूल येथे शनिवारी ३५० विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घेतला सहभाग.
गेली ६वर्ष स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थी भाविष्यातील स्पर्धा परिक्षेत तयार व्हावेत या उदात्त हेतूने नवनाथ केंजळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्पर्धा परिक्षेचे आयोजन केले होते.या परिक्षेसाठी तालुक्यातील चिंचणी,मोरावळे,खामकरवाडी,केंजळ, मालुसरेवाडी, केसकरवाडी,भणंग,ओझरे,बिभवी,मेढा, आनेवाडी,वाघेश्वर हायस्कूल शाळांनी सहभाग घेतला होता. ही
स्पर्धा परीक्षा चार गटात झाली.
इयत्ता पहिली ते दुसरी, इयत्ता ३ री ते ४ थी,इयत्ता ५ वी ते ७ वी. इयत्ता ८वी ते १० वी, अशा
प्रत्येक गटात झाली.
प्रत्येक गटातील विजेत्या तीन स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र,व शालाउपयोगी वस्तू बक्षीसाचे वितरण जावली तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या हस्ते काही दिवसात दिले जाणार आहे.
Comments
Post a Comment