आंबेडकर कोणाच्या निमंत्र्यांची वाट पाहत आहेत?: पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल; भाजप जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्याचा केला दावा.

 आंबेडकर कोणाच्या निमंत्र्यांची वाट पाहत आहेत?: पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल; भाजप जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्याचा केला दावा.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

अमरावती प्रतिनिधी 

पी एन.देशमुख.

-------------------------------------

 अमरावती.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत आले पाहिजे. यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली पाहिजे. पण आता ते कोणाच्या निमंत्र्यांची वाट पाहत आहेत हे मला माहित नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला आणला आहे. भाजप जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्याचा यावेळी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांना भारत जोडून न्याय यात्रे सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पण आंबेडकरांनी इंडिया आघाडी सहभागी झाल्यानंतर यात्रे सहभागी होणे योग्य ठरेल, अशी भूमिका घेतली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी अमरावती पत्रकाराशी बोलताना याप्रकरणी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की सध्या स्थिती इंडिया आघाडीत२८ पक्ष सहभागी झालेत. प्रकाश आंबेडकर या पक्षाच्या सर्व नेत्यांना व्यक्तीश: ओळखतात. त्यामुळे त्यांना इंडिया आघाडीत यायचे असेल, तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. पण ती कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहे, हे मला ठाऊक नाही. प्रकाश आंबेडकरांना खर्गे यांची भेट घेण्यात काय अडचण आहे? असा कळीचा सवालही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी सोबत आले तर ते देशाचे नेते होतील. कारण ते दलितांचे एक मोठे नेते आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन संसदेत यावे. त्यांनी सर्वांची भेट घेऊन इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली तर कुणीही नाही म्हणणार नाही. पण त्यांनी या व्यावहार्य मागणी करून बाबासाहेबांचे संविधान वाचवण्यास मदत केली पाहिजे. या उलट त्यांनी अवस्था मागणी केली तर त्याचा फायदा मोदींना होईल. व त्यांच्यामुळेच आमचे ९ उमेदवार पडले. अधिकाधिक उमेदवार उभे करून काँग्रेसच्या मतात विभाजन करणे हे मोदीचे धोरण आहे. गत लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे आमचे ९ उमेदवार पडले होते. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली पाहिजे. त्यांनी आमच्या सोबत यावे अशी इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांची इच्छा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आजच्या घडीला भाजपला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. भाजपाचा आत्मविश्वास घडल्यामुळे त्यांनी वैद्यतील राम मंदिराचा मुद्दा पुढे आणला. पण, भाजपाला त्यातही यश मिळाले असे वाटत नाही. त्यामुळे घडीव आर्थिक प्रलोभने दाखवून पक्ष फोडण्याचा काम केले आहे. एवढे करूनही भाजपला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. ते तपास यंत्रणाचा धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका ही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी भाजप व पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर निशान असताना केली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.