किसन वीर महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न.

-------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

-------------------------------

 वाई: दि.१९/१/२०२४ येथील किसन वीर महाविद्यालयांमध्ये देशभक्त कै. किसन तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ एन.सी.सी. युनिट आणि अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र काम केले. 

या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. गजानन भोसले म्हणाले की, 'रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण या शिबिराच्या माध्यमातून जीवदान देण्याचे कार्य करीत आहात त्यामुळे माझ्या या पवित्र कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा आहेत'. या कार्यक्रमासाठी रोटरी लाईट क्लबचे रोटरियन श्री दिलीप प्रभुणे हे मार्गदर्शक म्हणून बोलताना म्हणाले की, 'अशा प्रकारचे पवित्र कार्य किसन वीर महाविद्यालय अनेक वर्षापासून सातत्याने करत आहे, त्यामुळे या महाविद्यालयातील संयोजकांना विशेष धन्यवाद व शुभेच्छा आहेत.' 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, 'महाविद्यालयातील एन.सी.सी, एन.एस.एस.आणि इतर विद्यार्थी यामध्ये उस्फूर्त पद्धतीने सहभागी झालेले असल्याने मला अभिमान आहे. कारण रक्तदाना इतकं पवित्र दान अन्य कोणतेही नाही.' याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून; शुभेच्छा व्यक्त केल्या. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. फगरे यांचे करण्यात आले. मान्यवरांचे आभार प्रा.मनोज शिंदे तर सूत्रसंचालन कु. सानिका जाधव यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते'.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.