मुंडे गावातून तांब्याच्या धातूचे 05 बंब चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.

 मुंडे गावातून तांब्याच्या धातूचे 05 बंब चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.

----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी

 वैभव शिंदे

----------------------------------------------

          मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मा.अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.पतंग पाटील व कराड शहर डी बी पथकाने कराड शहरा लगत असले मुंडे गावातून तांब्याच्या धातूचे ०५ बंब चोरी करणाऱ्या आरोपीस पथकाने अटक केली असून त्यांचे ताब्यातून एकूण ०५ तांब्याचे धातूचे पाणी गरम करण्याचे बंब व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असे एकूण १,५०,००० /- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        कराड शहरालगत असले मुंडे गावात दिनांक २८/०१/२०२४ रोजी सकाळी ६.३० ते दिनांक २९/०१/२०२४ रोजी सकाळी ६.०० वाजताचे दरम्यान पाणी गरम करण्याचे तांब्याच्या धातूचे एकूण ०५ बंब चोरी झाले बाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करीत होते. गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना एक इसम तीन तांब्याचे धातूचे बंब संशयितरित्या मोटरसायकल वरून दैत्य निवारणी मंदिर येथून घेऊन जात असले बाबत गोपनीय माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी तात्काळ डीबी पथकासह सदर ठिकाणी रवाना होऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचे बंब चोरीचे असल्याचे कबूल केल्याने सदर इसमास अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे १) आरिफ अब्दुल खलीद शेख वय ४० वर्ष रा. खाजा झोपडपट्टी मिरज ता. मिरज जि. सांगली.

           सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक समीर शेख सातारा, मा.अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पो. पाटील, सफौ संजय देवकुळे, देसाई, पो.हवा शशी काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.