Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

घरफाळा सवलत योजनेमधून 2 कोटी 33 लाख घरफाळा वसूल.

 घरफाळा सवलत योजनेमधून 2 कोटी 33 लाख घरफाळा वसूल.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी

रजनी कुंभार 

---------------------------------------

सवलत योजनेतून 2,328 लाभार्थ्यांना 48 लाख 23 हजार रुपयांची सवलत.

कोल्हापूर ता.05: महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना दि.15 फेब्रुवारी 2024 अखेर 50 टक्के सवलत योजना जाहिर केली आहे. या सवलत योजनेचा शहरातील 2328 लाभार्थ्यांना लाभ देऊन 2 कोटी 33 लाख घरफाळा वसूल करण्यात आला आहे. महापालिकेने थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये सवलत योजना जाहिर केली आहे. यामध्ये दिनांक 24 जानेवारी ते दि.15 फेब्रुवारी 2024 अखेर 50 टक्के व दिनांक 16 फेब्रुवारी ते दि.15 मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत योजना जाहीर केली आहे.


या सवलत योजनेस शहरातील नागरीकांनी उदंड प्रतिसाद दिला असून आज अखेर शहरातील 2,328 लाभार्थ्यांनी या सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत योजनेमुळे नागरिकांना 48 लाख 23 हजार 27 रूपयांची सवलत मिळाली आहे. तरी उर्वरीत कालावधीत या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी चालू बिलासह थकीत रक्कम एकरकमी रोख, धनादेश, डिमांड ड्राफटव्दारे, ऑनलाईन सिस्टीमव्दारे (फोन पे,गुगल पे,मोबाईल वॉलेटव्दारे) भरता येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये कार्यालयीन वेळेत व शनिवार सुटटी च्या दिवशी भरता येणार आहे. तरी याचा मिळकतधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments