Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्यातील 44 818 पैकी 4389 प्रत्यक्ष कुटुंबाचा शंभर टक्के सर्वे पूर्ण तशिलदार अनिता देशमुख.

 राधानगरी तालुक्यातील 44 818 पैकी 4389 प्रत्यक्ष कुटुंबाचा शंभर टक्के सर्वे पूर्ण तशिलदार अनिता देशमुख.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------------

शासनाच्या निर्देशानुसार मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाची मोहीम सुरू होती राधानगरी तालुक्यातील 47 हजार पैकी 44 8 18 प्रत्यक्ष कुटुंबे पैकी 43 389 कुटुंबाचा शंभर टक्के सर्वे पूर्ण करण्यात आला असल्याची माहिती तशिलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली


मराठा समाजा ला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभर आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार तालुका पातळीवर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेचे नियोजन करण्यात आले होते कुटुंबाचा सर्वे करण्यासाठी प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक तलाठी विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या होत्या तालुक्यातील सुमारे 47000 कुटुंब असून यासाठी 308 संगणक व 22 प्रवेशक काम करत होते मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नावली द्वारे हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी तहसीलदार ने आव्हान केले होते त्याला राधानगरी तालुक्यातील जनतेने सहकार्य केल्यामुळे 47 हजार कुटुंब पैकी 44 818 प्रत्यक्ष कुटुंबापैकी 43 389 कुटुंबाचा सर्वे 100% पूर्ण करण्यात यश आले असून 1429 कुटुंब कायमस्वरूपी स्थलांतर झालेअसल्याने त्यांचा सर्वे करता येत नाही तसेच संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले असल्याचे राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments