कराड शहर डीबी पथकाने आगाशिवनगर परिसरातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एका युवकास केले अटक एकुण 60,200/- किमंतीचा मुद्देमाल केला जप्त.
कराड शहर डीबी पथकाने आगाशिवनगर परिसरातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एका युवकास केले अटक एकुण 60,200/- किमंतीचा मुद्देमाल केला जप्त.
----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-------------------------------------------------
श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी आगामी निवडणुका व कराड शहराचा राजकीय इतिहास पाहता कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के. एन. पाटील सो. यांना कराड शहरात बेकायदा शस्त्र, गावठी पिस्टल / कट्टे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषगाने वपोनि श्री के.एन. पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक पंतग पाटील यांचे मार्गदर्शनाखालो पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांची सदर कामगीरी साठी एक विशेष पथक म्हणून रचना केली होती.
दिनांक 06/02/2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदार मार्फत बातमी प्राप्त झाली की, आगाशिवनगर इमर्सन कंपनी जवळ एक संशयीत इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्याबाबत त्यांनी पोलीस उप निरीक्षक श्री पतंग पाटील व पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सदर पथकाने आगाशिवनगर इमर्सन कंपनी शेजारी सापळा रचुन मिळाले बातमी प्रमाणे एक संशयीत इसम ताब्यात घेतला त्याचेकडे अधिक चौकशी करुन अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक देशी बनावटीची मॅगझिन सह पिस्टल/ गावटी कट्टा व जिवंत काडतुस ( राउंड) असा एकुण 60,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री पतंग पाटील व डी. बी. टिम करीत आहेत.
अटक आरोपी :-लवराज रामचंद्र दुर्गावळे वय 29 वर्षे रा. आगाशिवनगर मलकापुर ता. कराड जि. सातारा
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो पोलीस उपनिरीक्षक अझरूददीन शेख सो, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
Comments
Post a Comment