Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सुंडी शाळेत किशोवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण.

 सुंडी शाळेत किशोवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण.

----------------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील 
-----------------------------------------

    सुंडी ( ता. चंदगड ) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत मराठी विद्यामंदिर सुंडी शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. किशोरवयीन मुलींसाठी अत्यंत गरजेचा असणाऱ्या मासिक पाळी या विषयावर समुपदेशन करण्यासाठी रूपा नित्यानंद हुददार, माऊली मेडिकल्स ढोलगरवाडी या उपस्थित होत्या.

आपल्या व्याख्यानातून त्यांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे योग्य निरसन केले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थिनींना आपल्या मेडिकल मार्फत सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वितरणही केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी कौतुक केले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या माधुरी पाटील, अध्यापिका बेबी कदम, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका आणि गावातील प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments