Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जेल भरो आंदोलनातून अशा सेविकांनी केला शासनाचा निषेध.

 जेल  भरो आंदोलनातून अशा सेविकांनी केला शासनाचा निषेध.

------------------------------------

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पीएन देशमुख.

-----------------------------------

अमरावती.

राज्य शासनाने मान्य केलेल्या मानधन वाढीचा शासन निर्णय काढावा, या मागणीसाठी गत२३दिवसापासून आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात संप सुरू आहे . परंतु शासनाने या संपाची दखल न घेतल्याने सोमवारी आशा व गटवर्तक संघटना आयटकच्या नेतृत्वात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात यावेळी शेकडो अशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या जेलभरो आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट म्हणून दिवाळीपूर्वी 2000 देण्याचे तसेच आशा सेविकांना सात हजार रुपये, तर गट प्रवर्तकांना दहा हजार रुपयाची वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता राज्य शासनाने अजूनही पूर्ण न केल्याने आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने १२ जानेवारीपासून संप पुकारला असून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन सुरू आहे. परंतु या बेमुदसंपाला२३ दिवस होऊनही सरकारच्या वतीने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाचे मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अशा सेवकांनी एकत्र येऊन जलभर आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो अशा सेविका या आंदोलनास सहभागी झाल्या होत्या. सरकार विरोधात जोरदार कृष्णा बाजी करत एकच नारा जीआर काढा ,अशी आशा घोषणा देण्यात या आंदोलनात महिलांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनामध्ये आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल देशमुख, रेखा मोहोळ, संजीवनी पटेल, संध्या जावरकर, संध्या शर्मा विद्या उगले नम्रता ठाकूर सुजाता गजभिये ,चारु वानखडे, वंदना कराड संध्या खांडेकर आदित्य कडू आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments