किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

 किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे

-------------------------------

  वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. 'देशभक्त किसन वीर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. या वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री मदनदादा भोसले यांच्या हस्ते होणार असून संस्थेचे सचिव मा.डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर बरोबरच सोलापूर, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि अन्य जिल्ह्यातून विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असून वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्त किसन वीर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, तसेच त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले पाहिजे हा उद्देश ठेवून या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेमधील विषय *१. आधुनिक भारताच्या इतिहासातील देशभक्त किसन वीर यांचे योगदान २. लय अवघड हाय गड्या उमगाया बाप... ३. चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू :आजचा मतदार ४. माणसाचे आयुष्य आता मोबाईल जगतोय ५. स्त्री शक्तीचा नारा केवळ शब्दातच फुलतो ६. अशी हवी तरुणाई राजकारणात! असे असून स्पर्धेत एकूण ४ पारितोषिके देण्यात येणार आहेत. पहिले पारितोषिक--5000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह, दुसरे पारितोषिक-- 3000 रु. रोख व स्मृतिचिन्ह,तिसरे पारितोषिक-- 2000 रोख व स्मृतिचिन्ह, दोन उत्तेजनार्थ--500 व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. अशी माहिती या वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक प्रा. डॉ.बाळकष्ण मागाडे यांनी दिली. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.